*भाजपचे आमदार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कोण आहेत? जाणून घ्या*
मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षांची आज निवड झाली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. विजयासाठी 145 मतांची गरज असताना राहुल यांना समर्थनार्थ 164 मते मिळाली. राहुल राजकीय घराण्यातील आहे. ते महाराष्ट्रातील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांची लढत महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्याशी होती. राहुल नार्वेकर हे राज्याच्या राजकारणातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पहिल्यांदाच आमदार झाले.राहुल यांचे वडील नगरसेवक राहिले आहेत राहुल नार्वेकर यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध होता. राहुल हे शिवसेनेच्या युथ विंगचे प्रवक्तेही राहिले आहेत. राहुल नार्वेकर हे राजकीय घराण्यातील आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर हे नगरसेवक राहिले आहेत. कोण आहेत राहुल नार्वेकर शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई







