आषाढी वारीच्या बंदाेबस्तासाठी पाेलीस प्रशासन सज्ज गामा डे नाईट रायडर डयूटी कमांडाे,महीलांसाठी दामिनी पथकासह बाहेर जिल्हातील पाेलीस व साेलापूर शहर पाेलीसांचाही समावेश
अकलूज -अकलूज मध्ये 5जुलै रोजी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत असून त्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.साध्या वेशातील वारकरी सीसी टीव्ही,पाेलीस मित्र,ग्रामसूरक्षादल,स्वंयसेवकाचा ताफा गून्हेगारी नियंत्रणासाठी व साेबत पाेलीस पाटील शिक्षक,एनसीसी एन एसएस,हाेमगार्ड व एस आरपी धडक क्रतीदल व वाँचर डयूटी साठी कॅमेरामन व सामाजीक कार्यकर्ते यांचेसह माेठा फाैजफाटा महीला व यूवा सह तैनात करण्यात आल्याची माहिती अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली.







आषाढी वारीसाठी २०२२ साठी साेलापूर ग्रामीण पाेलीसांकडून यंदा पाेलीस विभागाचा माेठा फाैफाटा बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आलेला आहे आणि आज ३जूलै २०२२ वा ११।०० वा पासून ते ०२।०० वा पर्यंत करमाळा विभागाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी मा.हिरे व अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांनी संपूर्ण बंदाेबस्ताचा आढावा घेतला व बंदाेबस्ताचे ब्रिफींग केले .यात वाहन पार्कींग पासून पालखी बंदाेबस्त व रिंगण बंदाेबस्त राेड बंदाेबस्त व गामा कमांडाे सह दामिनी पथक यांनी काय कर्तव्य करावयाचे ते सांगितले .यावेळी पोलीस हवालदार रमेश सुरवसे यांचेसह बंदाेबस्तासाठी ७०० ते ९०० पाेलीस अधिकारी व कर्मचारी पाेलीस मित्र व बाहेरगावचे कर्मचारी हजर हाेते.






