*सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी अन्…; उज्वल निकम यांचा सत्तानाट्यावर खोचक टोला*
अकोला : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी यावर भाष्य केलं आहे. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील राजकीय सत्तानाट्यावर त्यांनी खोचक टोला लगावाला आहे. *वकील उज्वल निकम नेमकं काय म्हणाले?* : सध्याची राजकीय परिस्थिती वीट आणणारी झाली आहे. त्यामुळे सध्या पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तर राज्यात अनेक गंभीर प्रश्न आहेत. मात्र याकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष झालं असल्याचं देखील ते म्हणाले.आजच्या राजकारणाचं असं झालाय की, वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडीतरावांच्या नावाचं घालायचं, उखाणा विलासरावांच्या नावाचा घ्यायचा आणि गर्भ मात्र देवरावांचा वाढवायचा, या पद्धतीची परिस्थिती राज्याच्या राजकारणात झाली असल्याचे जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले आहेत.सौजन्य -letsup.







