अकलूज पाेलीसांची बालविवाह प्रतिबंध संबधी महीलांसाठी कार्यशाळा
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज पाेलीसांची बालविवाह प्रतिबंध संबधी विविध सामाजीक संस्था व सामाजीक कार्य करणा-या मान्यवर प्रतिष्ठीत महीलांसाठी व महीला पाेलीस पाटील यांचेसाठी दि २४ जून २०२२ राेजी कार्यशाळा घेण्यात आली.यात महीलांची सामाजीक स्थिती व मूल्य यावर भर दिला असून,जास्तीत जास्त महीलांनी बालविवाह प्रथेला प्रतिबंध करून ही प्रथा राेखण्याचे आवाहन पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांनी केले.यावेळी सून आणि मूलीची सामाजीक स्थिती व नकळत घडणारे गून्हे याची माहीती पाेह रमेश सूरवसे पाटील यांनी दिली व बाल गून्हेगारीत डाँटर्स माँम फाँऊडेशनने पाेलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन महीला पाेलीस उपनिरीक्षक स्वाती कांबळे यांनी केले.तर डाँटर्स माँम फाँऊडेशनच्या मान्यवर संस्थापिका व अध्यक्षा साै शितल देवी धैर्यशिल माेहीते पाटील यांनीही या उपक्रमाचे स्वागत करून अकलूज शहर व परीसरात बालविवाह हाेणार नाहीत. याची काळजी घेवू आणि कूठे असा प्रकार हाेत असेल तर महीलांचे वतीने प्रतिबंध करण्याची हमी घेवून पाेलीसांना सहकार्य करण्याची भूमिका राहील असे प्रतिपादन यावेळी केले.या कार्यक्रमास ४० ते ५० महीला उपस्थित हाेत्या.










Great blog you have here but I was curious about if you knew of any forums
that cover the same topics talked about here? I’d really like to be a part of group
where I can get feedback from other experienced individuals that share
the same interest. If you have any recommendations, please let me know.
Kudos!
ओके