*कोल्हापूर जिल्हा बार असो व जिल्हा विधी सेवा मार्फत जागतिक योगदिन उत्साहात साजरा.*
कोल्हापूर दि.२४ (केदार लोहकरे याजकडून)कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कोल्हापूर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,कोल्हापूर यांचे वतीने “आंतरराष्ट्रीय योग दिन” निमित्त जिल्हा न्यायालय न्यायसंकुल, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी जिल्हा न्यायधिशसो श्रीमती पी.एफ.सय्यद हजर होत्या.सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक विधिसेवा सचिव न्यायाधीश प्रितम पाटील यांनी केले.यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड गिरीश खडके यांनी प्रुमुख पाहुणे व योग शिक्षक यांचे स्वागत केले. या वेळी योग शिक्षक संभाजीराव काकडे सर,अॅड.लक्ष्मणराव उर्फ डी.जी.पाटील सर यांनी योग साधनेचे महत्व सांगताना म्हणाले की,माणसाचे जीवनात योगासनाचे खूप मोठे महत्व आहे.या धावपळीचा,दगदगीचा जीवनात योगसाधनाच उत्तम शरीर ठेवू शकते. यावेळी मोठ्या संख्येयेने उपस्थित असलेले सर्व वकील,न्यायाधीश,कर्मचारी वर्गांनी योग शिक्षक डी.जी.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विविध योगाची आसन,प्राणायाम करणेत आले. या कार्यक्रमास सर्व न्यायाधीश, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड सुधीर चव्हाण,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुखअॅड संदीप चौगुले,माजी अध्यक्ष अॅड.शिवाजीराव राणे,अॅड.प्रकाश मोरे,अॅड.व्ही.आर.पाटील,अॅड.बी.आर.शेळके,अॅड.संकेत सावर्डेकर,अॅड.इंद्रजित चव्हाण,अॅड.विक्रम सावंत,अॅड.राजेंद्र पाटील,अॅड.रवींद्र जानकर,अॅड.सनदी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांनी मानले.







