*मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर!*
शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठी ऑफर दिली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्यापेक्षा मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांना दिलीय.👉 मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे रहावे यासाठी मी ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. मागील अडीच वर्षांपासून सुरु असलेली ही खदखद आज एकनाथ शिंदे यांच्या तोंडून बाहेर आली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, आणि कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होता कामा नये, तसेच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळावी, या मागणीवर शिंदे ठाम आहेत. ✨ शिंदे चर्चा करण्यास तयार आहेत पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशीही त्यांनी मागणी केलीय. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे यांचे नाव सुचवलं होतं. मात्र, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी विरोध दर्शवला होता. म्हणून शिंदे यांचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंग झालं.📍 दरम्यान, गेल्या अडीच वर्षात देखील पक्षातील प्रमुख निर्णय प्रक्रियेतून एकनाथ शिंदे यांना परस्पर दूर ठेवलं जात होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सर्वात बलाढ्य नेते आहेत. असं असूनही त्यांना मिळणारी सापत्नं वागणूक शिवसेनेच्या इतर आमदारांनाही खटकत होती.






