*एकनाथ शिंदे आहेत तरी कोण? त्यांचे शिवसेनेत वजन कसे वाढले?*
राज्यात सत्ताधारी आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेत फूट पाडणारे सूत्रधार हे एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे आहेत तरी कोण? शिवसेनेत त्यांचे वजन एवढे कसे वाढले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात….🤔 *कोण आहेत एकनाथ शिंदे?* :● 1980 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे कारण होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रभाव ● एक शाखाप्रमुख या पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. ● ते 2004 मध्ये एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले होते.● 2009, 2014, 2021 मध्ये ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदार संघातून ते सलग तीन वेळा विधानसभेत पोहोचले.● एकनाथ शिंदे यांनी एकूण चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.● 2019 च्या सुरूवातीला त्यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी मिळाली.● सध्या ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.💁♂️ *एकनाथ शिंदे जनतेचे नेते कसे बनले?* : आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्यांसाठी विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे गळ्यातील ताईत बनले.📍 *शिंदे यांचा राजकीय प्रवास* :● 1997 – ठाणे महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवड.● 2001 – ठाणे मनपात सभागृहनेतेपदी निवड.● 2001 ते 2004 – सलग तीन वर्ष ठाणे मनपात सभागृह नेतेपदी.● 2004 – ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.● 2005 – ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती.● 2009, 2014, 2019 – सलग विधानसभेमध्ये निवडून गेले.● 2014 – फडणवीस सरकारच्या सुरूवातीच्या महिनाभराच्या कार्यकाळात विरोधी पक्ष नेतेपद.● 2014 – सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री. ● 2019 – महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्री







