श्री गणपती फार्मसीत जागतिक योग दिन साजरा कन्हेरगाव, दि. ( प्रतिनिधी) अकोले खुर्द, तालुका माढा येथील श्री गणपती फार्मसीत योग दिनानिमित्त योग व आहार प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात आली. भारतात योगाभ्यासाची जवळ जवळ पाच हजार वर्ष जुनी परंपरा आहे, योगाला आपले शरीर व आत्मा यांच्यातील सामंजस्याचा अद्भुत विज्ञान मानले जात आणि प्राचीन पद्धतीला जागृत करण्यासाठी २१ जून हा दिवस जगामध्ये योग दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात २०१५ पासून झाली आणि याचेच औचित्य साधून आज २१ जून रोजी गणपती फार्मसीत ८ वा योग दिन साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग करण्याचे अनेक फायदे आहेत आपलं मन व आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग करावा.हात, पाय, पोट, मान, शरीराचे सर्व स्नायू बळकट व्हावेत तसेच विविध रोगांपासून मुक्ती मिळावी म्हणून योग केला जातो. यावेळी श्री गणपती फार्मसीत विद्यार्थ्यांना योग व आहार याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी श्री. नवनाथ सरडे व सौ जयश्री सरडे यांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विविध योग करून दाखवले. विद्यार्थ्यांनी व तसेच सर्व शिक्षकांनी या मार्गदर्शनाचा पुरेपूर फायदा घेतला. योग माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जातो त्यामुळे मनाला शांती मिळते व सतत ताजेतवाने राहावे म्हणून प्रत्येकाने योगा केला पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तसेच आहाराबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. या प्रशिक्षणास संस्थेचे सचिव डॉ. आर.डी बेंदगुडे,अध्यक्ष अॕड. विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे, प्रा. सुकुमार लांडे, प्रा. शिवराज ढगे, प्रा. रोहिणी गुटाळ, प्रा.प्राची पुराणिक,तसेच सर्व विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. प्रशांत मिसाळ यांनी काम केले, आभार प्रदर्शन प्रा.दिव्या ओस्तवाल यांनी केले.







