श्री गणपती फार्मसीमध्ये विनाशुल्क अर्जाची सुविधा*प्रथम वर्ष डी.फार्मसीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू*
मौजे अकोले खुर्द. ता. माढा येथील श्री गणपती फार्मसीमध्ये प्रथम वर्ष डी. फार्मसी (पदवीका) च्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. ९ जून २०२२ पासून सुरू झाली असून ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. ८ जूलै २०२२ पर्यंत चालणार आहे अशी माहिती श्री गणपती संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे व प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या https://phd22.dte.maharashtra.gov.in संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.श्री गणपती फार्मसी मध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया दि. ९ जून २०२२ पासून सुरू झालेली आहे. प्रथम वर्ष डी. फार्मसी (पदवीका) प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि. ८ जूलै २०२२ पर्यंत चालेल. रजिस्ट्रेशन साठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत व अधिक माहितीसाठी 77450 82754 व 9545553690 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी केले.







