राजकीय क्षितिजावर अढळ असलेला कृतिशील नेता

दूरदर्शी माणसाचे कर्तृत्व काळाच्या पुढे कसे असते याचा प्रत्यय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याचा एकेक पदर उलगडताना येऊ लागतो. केवळ एक नाव, व्यक्ती नाही तर ती एक कारकीर्द, एक मोहिम, एक वसा, एक विचार आणि समाजकारणातील त्यांची लोकसेवा माझ्यासारख्या लाखो तरुणांसाठी आजही दिपस्तांभाप्रमाणे खुणावत आहे. त्यांचे कर्तृत्व चौफेर स्वरूपाचे आहे. यशस्वी आणि द्रष्टा नेता, समाजसुधारक, विचारवंत, कला रसिक, उत्तम प्रशासक अशा अनेक पैलूंनी मढवलेले व्यक्तिमत्त्व. गेली पंच्चांवन्न वर्षे महाराष्ट्र व महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या प्रगतीला व गतीला वाहिलेले, कधीही कुनावर उपहास न करता अजातशत्रू व्यक्तिमत्त्व टिकविणे साधी सोपी गोष्ट नाही. आजही माणुसकीला कधीही बाजूला पडू दिले नाही. सत्ता असो वा नसो आपल्या प्रभावशाली नेतृत्वाच्या व माणसं जोडण्याच्या कलेच्या माध्यमातून विकासाच्या रथाला चौफेर उधळवणारे, आजही सर्वांना आपले वाटणारे मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील उर्फ मोठ्या दादांना वाढदिवसाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा….. वर्ष होतं १९८३ चं वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते तर त्यांच्याच मंत्रीमंडळात पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास मंत्रालयाची जबाबदारी लातूरच्या शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडे होती व त्याच खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दादांकडे होती. त्या काळात राज्यभर नवीन प्रकल्प आकारास येत होते. त्यापैकी नीरा देवघर धरण. १२.२६ टिएमसी क्षमतेचे धरण पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर बांधण्यात आले होते. त्या धरणांचे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी विस्तृत आराखडा बनवून धरणांचे लाभक्षेत्र निश्चित केले व खात्याच्या सचिवांनी प्रथम दादांकडे मंजूरीसाठी पाठवला. आराखडा पाहिला मात्र त्यावर सही केली नाही. परत पाठवली. सचिवांनी निलंगेकर साहेबांना सांगीतले. साहेबांनी परत फाईल दादांकडे पाठवण्याची सूचना केली.पुन्हा दादांनी सही न करता ती फाईल परत पाठवली. ही गोष्ट निलंगेकरा साहेबांच्या कानावर जाताच त्यांनी दादांना भेटून फाईल मंजूर न करण्याचे कारण विचारले. तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले साहेब, जोपर्यन्त माझ्या मतदारसंघातच समावेश धरणाच्या कार्यक्षेत्रात होत नाही तोपर्यन्त मी त्या फाईलवर सही करणार नाही. असे स्पष्ट व ठणकावून सांगितले. कारण पुणे भोर व सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्याचा समावेश धरणाच्या कार्यक्षेत्रात केला गेला होता मात्र त्यातूनच नीरा नदीच्या खोऱ्यातील माळशिरस तालुका मात्र वगळण्यात आला होता.दादा सही करत नसल्याची गोष्ट निलंगेकरांनी वसंतदादांच्या कानावर घातली. वसंतदादांनी तडकाफडकी दादांना बोलवून घेतले व फाईलवर सही न करण्याचा जाब विचारला तेव्हा राजकीय क्षितिजावर अढळ असलेला कृतिशील नेता म्हणाला माझ्या वडिलांनी दुष्काळाने होरपळलेल्या माळरानाचं नंदनवन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आजही अपूर्ण आहे. नीरा देवघर धरणांचं पाणी माझ्या मतदारसंघाच्या शिवेवर येईल त्याचवेळी माझ्या भागातील शेतकरी मला जाब विचारेल. त्यांना मी काय उत्तर देवू. माझी बांधिलकी मंत्रिपदाच्या खुर्चीत नाही तर दुष्काळामुळे व नियतीशी झुंजण्यातच शेतकऱ्यांशी आहे. माझ्या एका निर्णयाने त्यांच्या फाटक्या आयुष्याचा साधा एक ठिगळ जरी मी लावू शकलो तरी माझ्या आयुष्याचं सार्थक असेल. हे ऐकताच वसंतदादांनी सचिवांना माळशिरस तालुक्याचा समावेश धरणाच्या लाभक्षेत्रात करण्याचा आदेश दिला. आज या धरणातून सांगोला, फलटण, माळशिरस व पंढरपूर या भागांसाठी डाव्या कालव्यातून ५७ टक्के पाणी मिळते. दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी पहिल्यांदा मिळालेली मंत्रीपदाची खुर्ची पणाला लावली होती.विजयसिंह मोहिते पाटील केवळ बोलके विचारवंत नव्हते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक कृतिशील समाजवादी, विज्ञानवादी समाविष्ट आहे. लोकशाहीत गरिबांची, वंचित, उपेक्षित घटकांची सेवा व धर्मनिरपेक्ष राजकारण करावे लागते म्हणून मतभेदाला मनभेदाचे, मनभेदाला व्यक्तिभेदाचे, व्यक्तिभेदाला व्यक्ति द्वेषाचे स्वरूप आले तर लोकशाहीचे मांगल्य संपून जाईल म्हणून केवळ आपलेच नव्हे तर इतर विरोधी पक्षाच्या माणसांनाही ते आजपर्यंत सन्मानाची वागणूक देतात. सार्वजनिक जीवनात सर्वस्पर्शी भूमिका आजही बजावत आहेत. वर्तमानकाळात सर्वच पक्षांच्या नेत्यांची भाषा व भूमिका खालच्या पातळीवर गेली आहे पण दादांनी कधीच कुणावर टिका टिप्पणी व सभ्यता सोडली नाही म्हणूनच अधिवेशन चालू असताना बाहेर दादा आलेले कळताच आमदार व मंत्री अधिवेशन सोडून भेटण्यासाठी आलेले होते. प्रामाणिक लोकसेवा केली की माणूस दहा बाय दहाच्या खोलीतून उच्च पदापर्यंत येतो याचा प्रत्यय दादांकडे पाहून येतो. असं कोणतं खाते नव्हते ते दादांकडे नव्हते. जी खाती कोणी घेत नव्हती त्या खात्याचा कायापालट केला व त्यातूनही लोकांची सेवा व विकास करता येतो हे दाखवून दिले. उदा पर्यटन खाते. महा मानवांच्या विचारांना शिल्पसृष्टीच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी सरकारला कायदा करण्यासाठी भाग पाडले. बे घरांना घरकुले दिली, गुरांसाठी चारा छावण्या, जेष्ठ आणि निवृत्त क्रीडापटूंना अनुदान व नोकरी देण्याचा निर्णय घेतला, बांधकाम मंत्री असताना पाच हजार लोकवस्तीचे खेडी पक्क्या रस्त्याने जोडली, राज्यातील चार पालखी मार्गाचे रुंदीकरण केले. मागासवर्गीय भूमिहीनांना अतिरिक्त जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला, दुष्काळ पडल्यावर मोफत पाणीपुरवठा व गुरांसाठी मोफत चारा. मुख्य म्हणजे प्रत्येक गावात एक गाव एक पाणवठा त्यांनी सुरू केला. प्रत्येक गावात हायमास लॅम्प, एस. टी निवारा सेड. मला वाटते कोणत्याच मंत्र्यांनी महाराष्ट्रत दादां ऐवढी कामे केलेली नसतील. एकंदरीत त्यांच्या कार्यात त्यांनी सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवलेले आहेत. सडक्या बुद्धीच्या राजकारणी मंडळीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह शेजारच्या मराठवाडय़ासाठी संजीवनी देणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना. सहा जिल्ह्य़ांतील ३१ तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासह सिंचन व उद्योगासाठी पाणी मिळणार आहे. हे मुद्दाम होऊ दिली नाही कारण फक्त विजयसिंह मोहिते पाटील यांनाच त्याचे श्रेय जाईल क्षम्हणून रखडवलेली आहे. पण देर है लेकिन अंधेर नाही……. पुन्हा या कृतिशील नेत्यास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हे पाडूरंगा त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य दे…… प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज9226144836(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)

















