*श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न*
टेंभुर्णी प्रतिनिधी, मौजे अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल टेंभुर्णी चे प्राचार्य व संस्थापक गाडेकर सर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.प्रमुख पाहुणे गाडेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व स्वतःचे कौशल्य वापरून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात,असे सांगुन अंतिम परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे सचिव डॉ.आर.डी.बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी मधील करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी शिवरत्न परचंडे यांना यावर्षीचा “आदर्श विद्यार्थी” पुरस्कार देऊन प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा.स्वाती पाटील, प्रा. केतकी पाटील, प्रा.मोनिका माळी, प्रा.दिव्या ओस्तवाल, प्रा.रूपाली राऊत, प्रा.प्राची पुराणिक,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन प्रा.कोमल यादव यांनी मानले.







