*श्री गणपती बी.फार्मसी महाविद्यालयामध्ये पालक सभा संपन्न.*
अकोले खुर्द तालुका माढा येथील श्री गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये शिक्षक-पालक सभा घेण्यात आली. पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणे या उद्देशाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.पालक प्रतिनिधी श्री.महादेव घाडगे व सौ.यमुना वारे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी प्रा. प्रशांत मिसाळ यांनी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पालकांना दिली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर.डी.बेंदगुडे यांनी पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले. पालकांमधून आनंत शिंगाडे, शिवाजी गायकवाड व राजेंद्र पवार यांनी शंका व प्रश्न विचारले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा. शिवराज ढगे, प्रा. महादेवी भोसले, प्रा. सुकुमार लांडे, प्रा. रोहिणी गुटाळ व पालक वर्ग उपस्थित होते.







