पत्रकारांनी शब्द वापरताना काळजी घ्यावी : अरविंद जोशी अकलूज ता.26: वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अनेक शब्द जनमानसात रूढ होत असतात त्यामुळे पत्रकारांनी प्रत्येक शब्द वापरताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे मत अरविंद जोशी यांनी व्यक्त केले प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा शुभारंभ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व सहकार महर्षी आणि आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी ‘भाषिक व्यवहार आणि पत्रकारिता’ या विषयावर अरविंद जोशी यांचे व्याख्यान झाले. द्वितीय सत्रात प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांचे ‘पत्रकारितेची अचारसहिता’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात आंबेगावे यांनी पत्रकारांची नैतिक जबाबदारी, मर्यादा व कायदे आणि त्या अनुषंगाने पत्रकारांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देत संघातील सदस्यांना जर कोणी जाणून बुजून त्रास देत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ, परंतु प्रत्येक सदस्याची हित जपू असे आश्वासनही दिले. यावेळी प्रिय संपादक व सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये बापू सावता एकतपुरे यांना समाज सेवक, डॉ. विनायक भीमराव फुले यांना उत्कृष्ट सेवा, लहूकुमार अंबादासराव शिंदे यांना उत्कृष्ट संपादक, सोपान महादेव मोरे यांना उत्कृष्ट गायक, रेणुका बँक शाखा अकलूज यांना उत्कृष्ट सेव सेवा यांना यांचा समावेश होता या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांसह लातूर सातारा पुणे जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, शशिकांत कडबाने, नौशाद मुलानी व गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले







