*ब्रेकिंग! अखेर संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार.
राज्यसभेच्या उमेदवारीवरून आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारी देण्याबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.💫जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या स्वराज्य संघटनेला मी बळकट करणार आहे. त्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटीत करणार, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 📍दरम्यान, मागील 15 वर्षे मी जनतेसाठी अहोरात्र काम केले. यापुढेही अधिक बळकटीने हे काम पुढे नेणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.












