अकलुज पोलीसांचा आदर्शवत उपक्रम.पारधी समाजातील तरुणांसाठी भरती पूर्व मार्गदर्शन व माहिती शिबीराचे आयोजन
अकलुज-(प्रतिनिधी )नेहमीच समाजात अपमानाची वागणूक मिळणाऱ्या व दुर्लक्षित असलेल्या पारधी समाजातील सुशिक्षित युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अनेक युवक नाईलाजाने गुन्हेगारी कडे वळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अकलूज चे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि अकलूज पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरुणराव सुगावकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सवतगव्हाण येथील पारधी वसाहतीला भेट देऊन तेथील युवकांना मार्गदर्शन केले होते. एव्हढेच नव्हे तर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या नावीन्यपूर्ण अशा ऑपरेशन परिवर्तन या संकल्पनेतून पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अकलूज पोलिसांनी येथील तरुणांना स्वतःच्या खर्चातून वेगवेगळे व्यवसाय सुरु करून दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक देखील झाले.27मे रोजी पारधी समाजातील काही सुशिक्षित तरुणांना अकलूज पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेऊन एक नवीन संकल्पना राबविली.सवतगाव येथील खास पारधी युवकांसाठी अकलुज येथे पोलीस भरती पुर्व मार्गदर्शन आणि माहिती शिबीर आयोजीत करुन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथमच एक नवा आगळा -वेगळा आदर्श निर्माण केला.महाराष्ट्र शासनाच्या नियम, अटी धाेरणानुसार लवकरच ७ हजार पाेलीस शिपाई यांची भरती हाेणार आहे. या अनुषंगाने अनेक युवकांचे पाेलीस भरतीचे स्वप्न असते. अनेक गरीब युवक -युवतींचे योग्य मार्गदर्शना अभावी हे स्वप्न पूर्ण होत नाही.त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी व पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते यांची पारधी समाजा साठी असलेली ऑपरेशन परिवर्तन संकल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टीने अकलुज पोलीसांनी माळीनगर पासुन जवळच असलेल्या सवतगव्हाण येथील पारधी वसाहतीमध्ये असलेल्या अनेक तरुणांमध्ये पोलीस भरतीत उतरण्यासाठी पात्रता असुनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्या पदरी सतत अपयश पडते. खाजगी कंपनीतही कोणी नोकरी देत नाही.लवकर लग्न हाेत नाही.त्यामुळे काही जण नाईलाजाने गुन्हेगारीकडे वळतात.लहान गुन्ह्यांपासुन सुरवात करीत भविष्यात माेठे गुन्हे करत गुंड बनतात.. त्यामुळे या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून पोलीस भरतीत उतरवले तर ते सन्मानाने जगतील.समाजातील गुन्हेगारी कमी होवुन कायद्याचे राज्य येईल.त्यासाठीच अकलुज पोलीस सातत्याने प्रयत्नशील असतात. उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ .बसवराज शिवपूजे आणि अकलूज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूणराव सुगावकर यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा दल चे समन्वयक. पाेलीस मित्र व पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील यांचेसह कार्यरत असलेल्या टीम ने आजपर्यंत अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत.त्याच उपक्रमातुन सवतगव्हाण ,माळीनगर ता.माळशिरस जि. साेलापूर येथील पारधी युवकांना दिनांक २७/५/२०२२ राेजी सकाळी 11वाजता वाजता अकलूज पाेलीस ठाण्यात बोलवुन पाेलीस भरतीची माहीती दिली.तसेच तुम्ही कमी न पडता तयारी करा ,तुमच्या प्रयत्नाला आमची साथ असेल असे ठोस आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॕ.बसवराज शिवपूजे यांनी उपस्थित युवकांना देत अभ्यास कसा करायचा. कोणती पुस्तके वाचायची, भरती चि तयारी कशी करायची याचे विस्तृत मार्गदर्शन केले.














