*विद्यार्थ्यानी संकटाना न घाबरता जीवनात यशस्वी व्हावे : प्रा.अशोक भोसले यांचे प्रतिपादन*
कोल्हापूर दि.२५ (केदार लोहकरे याजकडून)कोडोली (ता.पन्हाळा) ” बी.एड.केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संधी उपलब्ध असून त्यासाठी आपली गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे.जीवनात येणार्या संकटाना न घाबरता आपले जीवन यशस्वी करावे,” असे आवाहन वारणा करिअर अकॅडमीचे संचालक प्रा.अशोक भोसले यांनी आज येथे बोलताना केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांना शुभेच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने टे टे चे मोफत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांच्या वतीने टे ट मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते. कार्यक्रमाची सुरवात विद्येची आराध्य देवता सरस्वती,महात्मा गांधी व माजी आमदार कै.यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनी स्वागत गीत गायिले.प्रा.एस.डी. रक्ता डे यांनी सुमधूर बासरी वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय मनोगतातुन प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील म्हणाले की माहेरहून सासरी निघालेल्या मुलीच्या आईवडिलांची जशी अवस्था होते तशी आज आमची अवस्था झाली आहे.तुम्ही भविष्यात प्रामाणिकपणे आपल्या जबाबदार्या पार पाडा. तुमच्या नाव लौकिका बरोबरच आपल्या माहेरचा म्हणजेच कॉलेजचा ही नावलौकिक करा.आपली प्रतिमा खराब होईल असे वागू नका. यानिमित्ताने प्रा.अजित लोक रे,प्रा.डी.डी.पाटील,प्रा.एस.डी.रक्ता डे,प्रा.श्रीमती जी.के.मुजावर,प्रा.संजय गणपती जाधव यांनी भाषणाद्वारे विद्यार्थी-शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पूजा पाटील, संतोष शेटे, वैभव पाटील,मनोरमा सोरटे या विद्यार्थी-शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव पाटील यांनी केले.सागर आळवेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.स्वप्नाली कोळेकर यांनी आभार मानले. स्नेहल चौगुले आणि संकेत सुतार यांनी सूत्रसंचलन केले.या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कॉलेजच्यावतीने भोजन देण्यात आले.त्यासाठी कार्यालयीन अधीक्षक एस.के.पाटील,वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर,अखिलेश पाटील आणि तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.














