• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home राजकारण

पवार साहेब आणि ब्राम्हण समाज बैठक-ऍड अविनाश टी काले अकलूज मो न 9960178213

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 22, 2022
in राजकारण
0
पवार साहेब आणि ब्राम्हण समाज बैठक-ऍड अविनाश टी काले अकलूज मो न  9960178213
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पवार साहेब आणि ब्राम्हण समाज बैठक~~~~~~~~~~~~~~~~~~ऍड अविनाश टी काले अकलूज मो न 9960178213

~~~~~~~~~~~~~~~~~~पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय असलेल्या निसर्ग मंगल कार्यालयात काल शनिवारी दिनांक 21मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र जी पवार साहेब यांचे समवेत ब्राम्हण समाजाची बैठक पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप जी गारटकर साहेब यांनी हा समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला मूळचे इंदापूर तालुक्यातील प्रदीप जी गारटकर रहिवाशी असून राष्ट्रवादी काँग्रेस मधे येण्यापूर्वी पतीत पावन नावाचे हिंदू संघटन चालवत होतेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अलीकडे स्वीकारलेल्या ब्राम्हणेतर भूमिके मुळे विशेषतः पुणे येथील एका कार्यक्रमात पुणेरी पगडी नाकारून फुले पगडी स्वीकारल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा ब्राम्हण विरोधी पक्ष आहे अशी प्रतिमा निर्माण झाली याला अनेक राजकीय पदर आहेत , भाजपा किंवा जनसंघ जेंव्हा कमजोर स्थितीत होती तो पर्यंत देशभरात ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात कोणतेच पक्ष बोलत नव्हते , ब्राम्हण समाज ही वैचारिक दृष्ट्या मुक्त समाज होता आणि तो काँग्रेस , समाजवादी, कम्युनिस्ट अशा सह अगदी बसपा सारख्या पक्षात ही विखुरला गेलेला होता संघ प्रणित भाजपाने लालकृष्ण अडवाणी यांचे नेतृत्वात मंडल विरोधात भूमिका घेऊन ओबीसी आरक्षणाला विरोध दर्शवला ,या पहिल्या टप्यात या पक्षाने उच्च वर्णीय समाजात आपला पाया मजबूत केला या पक्षाने दुसरे हत्यार बाहेर काढले ते बाबरी आंदोलनाचे , शिलाण्यासाचे यातून राम मंदिर उभारणीचा अजेंडा बाहेर आला आणि याच भूमिके मुळे बहुजन समाजातील अनेक वर्ग भाजपला जोडले गेले , भाजपा हा पक्षीय राजकारणातील विकल्प मानला गेल्याने त्याच्या इतर वैचारिक पाया कडे लक्ष न देता एस सी ,एस टी , ओबीसी वर्गातील लोक ही या पक्षाकडे आले , आणि आपल्याच हित विरोधी असलेल्या या पक्षाची शक्ती वाढीस लागली विशेषतः अटल बिहारी वाजपेयी यांच्या मवाळ चेहऱ्यावर देश भरातील लोक भाळले , भाजपा ने समान नागरी कायदा ते कलम 370सारखे मुद्दे उपस्थित करत आपले राजकारण चालू ठेवले , ज्या राज्यात भाजपा कमजोर आहे त्या राज्यात स्थानिक पक्षाशी तडजोड करत या पक्षाने आपले विस्तारवादी धोरण चालूच ठेवले यातून एक काळ असा आला की भाजपा हा केंद्रीय पातळीवरील प्रभावी पक्ष बनला , बाबरी मशीद पाडल्या नंतर देशभरात दंगल , बॉम्ब स्फोट झाले यातून ही हिंदू म्हणून भाजप कडे लोक वळले ,थोडक्यात आज हा पक्ष राजकीय शक्तीने पुरेपूर सामर्थ्य शाली बनला महाराष्ट्रात ही या पक्षाने आपली सत्ता निर्माण केली आपल्या विस्तारवादी धोरणाने प्रबळ बनल्या नंतर ॲनाकोंडा जसा आपल्या पिल्लांना च गिळतो त्या भूमिके नुसार ज्यांनी समर्थन दिले होते व ने सहकारी प्रादेशिक पक्ष होते त्यांना या पक्षाने आकुंचित करण्यास सुरुवात केली कधी काळी शिवसेनेचा .मुख्यमंत्री ही बाब मागे पडली आणि याच सत्ता स्पर्धेतून शिवसेना भाजपा पासून दुरावली आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी शिवसेनेला ही केंद्रीय पातळी वरील भाजपाचे हिंदुत्वा हून वेगळे हिंदुत्व दर्शवणे भाग पडले आणि हे हिंदुत्व सुध्दा , गैर ब्राम्हणी च आहे , म्हणून शिवसेना प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतात आमचे हिंदुत्व हे शेंडी, जानवे, आणि मंदिरातील घंटा बडवणे या पुरते सीमित नाही या ब्राम्हणी आणि अब्राह्मणी हिंदुत्व वादात फाळणी झालेल्या महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जागाच शिल्लक नव्हती आपला मतदार टिकवायचा असेल तर त्यांना या हिंदुत्वाच्या पासून दूर नेणे आवश्यक होते आणि ही गरज फक्त फुले शाहू आंबेडकरवादी तत्वज्ञानाच्या आधारे च श्यक्य होती यातूनच त्यांनी छत्रपती शिवरायांच्या ब्राम्हणी इतिहासाला नाकारण्याची भूमिका घेतली व दादोजी कोंडदेव ते समर्थ रामदास यांचे कनेक्शन खरा इतिहास मांडून तोडून टाकले , पुणे येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याची भूमिका असो किंवा जेम्स लेन प्रकरणा नंतर भांडारकर प्राच्य विद्या आणि इतिहास संशोधक मंडळा विरोधात केलेला हल्ला असो त्या प्रकरणातील संभाजी ब्रिगेड , व इतर मराठा सेवा संघ सारख्या संघटनांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस , व काँग्रेस मधील मराठा राज्यकर्ते उभे राहिले याच चळवळींनी डॉ अमोल कोल्हे ते अमोल मिटकरी सारखी नेतृत्व दिली अलीकडे अमोल कोल्हे यांनी केलेल्या भाषणा मुळे ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप केला गेला , ब्राम्हण समाज हा सॉफ्ट टार्गेट असतो म्हणून त्याचे वर आघात केला जातो असा ही आरोप केला जातो यातून प्रदीप जी गारटकर यांचे कडे कांहीं लोक आले व त्यांचे शी सवांद साधण्याचे काम पवार साहेबाना करावे लागले या संवादात पवार साहेब म्हणाले की टीका ही धोरणावर असावी ती कोणत्याही समाजावर नसावी आम्ही ही त्याच मताचे आहोत , समग्र ब्राम्हण समाजाचे विरोधात असण्याचे कारण कुणालाच नाही आम्हाला ही तसे वाटत नाही , पण इतिहासाची चाके उलट दिशेला फिरवून सनातनी हिंदू राष्ट्र निर्मिती ला आमचा वैचारिक विरोध हा राहणारच आहे अकलूज येथील आमचे मित्र सचिन शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तील मोठे नेतृत्व आहे त्यांनी थोड्याच वेळापूर्वी एक पोस्ट केली , ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्था बद्दल ब्राम्हणांना दोष दिला जातो ती व्यवस्था भ श्रीकृष्णाने निर्माण केली आहे , आणि ते तर क्षत्रिय होते असा त्यांचा युक्तिवाद आहे गुण कर्मा नुसार वर्ण निर्माण होतात , असा त्यांचा युक्तिवाद आहे आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला भारताचे महामहीम राष्ट्रपती शूद्र आहेत की ब्राम्हण?त्यांना जगन्नाथ पुरी मंदिरात प्रवेश का नाकारण्यात आला?सचिन शिंदे हे पंढरपूरचे विठ्ठल मंदिरात पूजा करण्याचे अधिकार प्राप्त करू शकतात काय? पवार साहेब या अंतर्विरोधावर कोणता निर्णय घेऊ शकतात?कडव्या सनातनी हिंदुत्वाची तोड सॉफ्ट हिंदुत्व असूच शकत नाही व्यक्ती म्हणून आस्था बाळगणे , आणि धर्मा आधारे राजकारण करणे या बाबी तील भिन्नत्व साहेब जाणतात साहेबांनी कितीही उदार मतवादी भूमिका घेतली तरी ब्राम्हण समाजाचा दृष्टिकोन फारसा बदलेल असे आम्हाला वाटत नाही त्यांचे आदर्श , त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा आज तरी निराळी आहे तूर्त इतकेच

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका                                                     अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद
राजकारण

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बैठका अकलूज, करमाळा व टेंभुर्णी येथे मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

October 12, 2026
पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!
राजकारण

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कोण मारणार बाजी? महायुतीतील बंडखोरीने वाढवली रंगत!

October 7, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
Next Post
अकलूजमध्ये एन.टीव्ही न्यूज मराठी च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* रक्तदान शिबिरास ४१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविले

अकलूजमध्ये एन.टीव्ही न्यूज मराठी च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* रक्तदान शिबिरास ४१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In