*अकलूजमध्ये एन.टीव्ही न्यूज मराठी च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* रक्तदान शिबिरास ४१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविले
प्रतिनिधी (अकलूज) : महाराष्ट्रात असंख्य मनावर अल्पावधितच अधिराज्य गाजवलेली वृत्तवाहिनी एन टीव्ही न्यूज मराठी च्या २० वा वर्धापन दिन निमित्त अकलूज शहरात माळशिरस प्रतिनिधी तथा समाजसेवक मोहसिन शेख यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्य रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या आशयास प्रतिसाद देत अकलूज शहरात प्रथमच एन.टी.व्ही.न्यूज या मराठी वृत्तवाहिनीच्या २० व्या वर्धापन दिना निमित्त अकलूज नगरपरिषद हाॅल येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाला.पत्रकार तथा समाजसेवक मोहसिन शेख यांच्या अथक प्रयत्नांतून या रक्तदान शिबिरास ४१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरास वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली. हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बख्तियार पठाण,इर्षाद सय्यद,फारूख शेख,इन्नूसबाबा सय्यद,समिर काझी,सोमनाथ खंडागळे,शाहरूख काझी,पप्पू शेख आदींनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमास अकलूज नगरपरिषदेचे विशेष सहकार्य लाभल्याने आयोजक शेख यांनी त्यांचे आभार मानले आहे.








