बागेचीवाडी गावची स्वच्छतेकडून सम्रुध्दी कडे वाटचाल
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
स्वच्छ गाव सम्रुध्द गाव यातुनच बागेचीवाडी ग्रामपंचायत ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे
ग्रामपंचायत नव्याने खरेदी केलेल्या अत्याधुनिक पर्यावरण पूरक इलेक्ट्रॉनिक घंटागाडीचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले
यामुळे गावातील स्वच्छतेला बळ मिळणार आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित लोकार्पण सोहळ्यात लोकप्रिय सरपंच कृष्णराज भैय्या माने पाटील उपसरपंच राहुल वाघ ग्रामपंचायत सदस्य रियज शेख संजय कांबळे महेश जगताप राजश्री इंगोले ग्रामसेवक औदुंबर माळी यांच्या उपस्थितीत नवीन घंटागाडीचे पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह वेंकटराव माने पाटील व माजी सरपंच हौसाजीराव माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बागेची वाडी ग्रामपंचायत बागेची वाडी ग्रामपंचायत ने स्वच्छतेकडून समृद्धीकडे एक दमदार पाऊस टाकले आहे ”
चौकट :-*दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गावासाठी एक चांगले काम आमच्या हातून घडले आहे गाव स्वच्छ असेल तर गावाची प्रगती होईल सर्व ग्रामस्थांनी कचरा रस्त्यावर व इतरत्र न टाकता तो कचरा घंटागाडी टाकून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे ग्रामपंचायतीच्या या पर्यावरण पूरक निर्णयामुळे गावातील स्वच्छतेला नवीन दिशा मिळणार आहे “सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटील*







