नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर गोसेवेसाठी चाऱ्याची गाडी भेट दिपराज माने देशमुख, शिवाजीराव घोडके व निखिल थोरात यांचा स्तुत्य उपक्रम
अकलूज | संघर्ष योद्धा न्यूज
नवरात्रीच्या पवित्र मुहूर्ताचे औचित्य साधून रत्नपुरी १६, संग्रामनगर, अकलूज येथील जाणता राजा गोशाळा व गोसेवा केंद्रात गोमातेच्या सेवेसाठी चाऱ्याची गाडी भेट देण्यात आली.
श्री. दिपराज फत्तेसिंह माने देशमुख, श्री. शिवाजीराव घोडके आणि चि. निखिल थोरात यांच्या वतीने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला
.हिंदू संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमातेचे जतन, संगोपन आणि सेवा ही आपली सांस्कृतिक परंपरा असून, गोसेवेच्या माध्यमातून माणसामध्ये दया, करुणा आणि सेवाभाव वृद्धिंगत होतो. याच भावनेतून गोमातेच्या सेवेसाठी चारा भेट देण्यात आला.
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून गोसेवेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
गायीं पाठीं लागे ।तो चि एक आम्हां सगे ॥ १ ॥ तो चि आवडे देवासी ।पुण्यवंत म्हणा त्यासी ॥ २ ॥ गाय ज्याचे घरीं ।त्याच्या पापा होय बोरी ॥ ३ ॥ तुका म्हणे माता ।तिची सेवा करा आत्ता ॥ ४ ॥ या अभंगातून गोमातेच्या सेवेचे महत्त्व स्पष्ट होते. गोमातेला मातेचे स्थान देऊन तिचे जतन, संगोपन, पूजन आणि सेवा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.‘
घरात आई-वडील आणि दारात गाय असेल, तर कुटुंब पूर्णत्वास जाते’ अशी भावना व्यक्त करत गोसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
समाजाने गोमातेच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले
.सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. अशा काळात नागरिकांनी आपल्या परिसरातील गोशाळांना भेट देऊन शक्य तेवढी मदत करावी, चाऱ्याची व्यवस्था करावी आणि गोसेवेच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. दिपराज फत्तेसिंह माने देशमुख, श्री. शिवाजीराव घोडके आणि चि. निखिल थोरात यांनी केले.
गोमातेच्या सेवेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात सेवाभाव आणि प्राणीमात्रांप्रती करुणेची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.







