• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे – होमियोपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
August 17, 2026
in आपले शहर
0
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे – होमियोपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे
0
SHARES
246
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे – होमियोपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे

टेंभुर्णी, (प्रतिनिधी) :“घटस्फोटाचे वाढते प्रमाण कमी करायचे असेल, तर विवाहपूर्व समुपदेशन अर्थात प्री-मॅरेज काउन्सेलिंग गरजेचे आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून दोन कुटुंबांना जोडणारा संस्कार आहे. त्यामुळे विवाहापूर्वी युवक-युवतींना परस्परांच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या, स्वभाव आणि कौटुंबिक जीवनाबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन होमिओपॅथी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांनी केले.

सरकारने लग्नपत्रिकेत जन्मतारीख नमूद करणे जसे बंधनकारक केले आहे, त्याचप्रमाणे Marriage Eligibility Certificate देणेही बंधनकारक करावे, अशी मागणी डॉ. भस्मे यांनी केली. असे केल्यास विवाहापूर्वी मुला-मुलींच्या काही शारीरिक समस्या जाणून घेता येतील. वैवाहिक जीवन परिपूर्ण न झाल्यास अनेक कौटुंबिक समस्या निर्माण होतात आणि परिणामी घटस्फोटासाठी प्रयत्न सुरू होतात, असेही त्यांनी सांगितले.

चर्चासत्रात डॉ. अभय मुथा यांनी ‘होमिओपॅथी आणि लैंगिक शास्त्र’ या विषयावर केलेल्या विवेचनाचा संदर्भ घेत डॉ. भस्मे बोलत होते.डॉ. अरुण भस्मे यांच्या वाढदिवसानिमित्त CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, सोलापूर आणि सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेगाहोमिओकॉन २०२६’ या एकदिवसीय वैद्यकीय परिषद व चर्चासत्राचे आयोजन रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी हॉटेल रामायणा, टेंभुर्णी येथे करण्यात आले.

या कार्यक्रमास सुमारे २५० होमिओपॅथिक डॉक्टरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे उद्यघाटन डॉ. अरुण भस्मे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास हरपळे, डॉ. बाळासाहेब हरपळे, डॉ. योगेश बोबडे, डॉ. रश्मी दुबे आणि डॉ. पांडुरंग गायकवाड उपस्थित होते

.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन तसेच सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या हक्कांसाठी संघटनेने केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली

.पुणे IMA ने CCMPच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनने इंटरव्हीन होऊन पात्र CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी मिळवून देण्यासाठी केलेल्या कायदेशीर लढ्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.

CCMP पात्र डॉक्टरांच्या नोंदणीचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघटना सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.तसेच दि. १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या MMC महामोर्चा आंदोलनात CCMP होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन पूर्ण ताकदीने सहभागी होणार असून, राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. गायकवाड यांनी केले.

एमएमसी नोंदणीच्या प्रश्नावर बोलताना भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी, “होमिओपॅथिक डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीसाठी सरकार दरबारी जी काही मदत आवश्यक आहे, ती करण्यास आम्ही तयार आहोत,” असे मत व्यक्त केले.

पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी डॉ. अरुण भस्मे यांनीही दि. १८ ऑगस्टच्या महामोर्चात राज्यातील सर्व पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्काच्या नोंदणीच्या प्रश्नासाठी एकजुटीने ताकद दाखवावी, असे आवाहन केले.

विविध जीवनगौरव पुरस्कारांनी डॉक्टर्स सन्मानित..‘

मेगाहोमिओकॉन २०२६’ मध्ये होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा विविध मान्यवरांच्या नावाने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.डॉ. सॅम्युअल हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार डॉ. श्रीधर पाटील (सोलापूर), डॉ. प्रमोद पाटील (मोहोळ), डॉ. मृदुला तळेकर (पंढरपूर) आणि डॉ. विलास हरपळे (सोलापूर) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. शरदचंद्र दत्तात्रेय गुणे जीवनगौरव पुरस्कार डॉ. कालिदास लिमकर (बार्शी) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. रंगनाथ गोपाळ कवीश्वर जीवनगौरव पुरस्कार डॉ. शुभांगी देशमुख (माळशिरस) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. डी. व्ही. निकम जीवनगौरव पुरस्कार डॉ. संगीता पाटील (पंढरपूर) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. एल. आर. भोसले जीवनगौरव पुरस्कार डॉ. रेखा रिसवडकर (सोलापूर) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. रामकृष्ण महादेव चिंचोळकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. सोमेश्वर ठोंगले (माढा) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. वामनराव बापुरावजी डहाने जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुनील वराळे (सोलापूर) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. मिलिंद राव जीवनगौरव पुरस्कार डॉ. क्षमा बकाल (बार्शी) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. प्रफुल्ल विजयकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम परदेशी (करमाळा) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. व्ही. डी. नागवंशी जीवनगौरव पुरस्कार डॉ. जयंत करंदीकर (कुर्डुवाडी) यांना प्रदान करण्यात आला.डॉ. संजीव मुजुमदार जीवनगौरव पुरस्कार डॉ. दत्तात्रेय चोपडे-पाटील (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला.तज्ज्ञांचे मार्गदर्शनपरिषदेमध्ये डॉ. आनंद देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. सुहास राऊत, डॉ. दयानंद पवार, डॉ. आण्णासाहेब पवार, डॉ. अभय मुथा आणि डॉ. सपना गांधी यांनी होमिओपॅथीच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले

.कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. बाळकृष्ण गायकवाड (अध्यक्ष) आणि डॉ. संजय देशमुख (सचिव) होते. आयोजन समितीचे चेअरमन डॉ. अंकुश लोंढे, सचिव डॉ. अजित नाळे, खजिनदार डॉ. आण्णासाहेब पवार आणि युवा आघाडी प्रमुख डॉ. फैज सय्यद, डॉ. नितीन कुबेर, डॉ. योगेश घोगरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

राज्य कार्यकारिणीतील डॉ. अमित भस्मे, डॉ. अजय तायडे पाटील, डॉ. निलेश चिकणे यांच्यासह राज्य सदस्य तसेच करमाळा, बार्शी, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील डॉक्टरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अविनाश घोलप, बिपीन परदेशी, डॉ. अमोल दुरंदे, डॉ. शरद चिकणे, डॉ. शिवाजीराव काळे, डॉ. निखिल जामदार, डॉ. रमेश जकापूरे, डॉ. मिलिंद हिंगमिरे, डॉ. विश्वनाथ शेंडे, डॉ. शहाजीराव डोंगरे, डॉ. बजरंग सुरवसे, डॉ. शशांक कुरळे आणि डॉ. प्रमोद जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले

.‘मेगाहोमिओकॉन २०२६’ हा कार्यक्रम होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी ज्ञानवर्धक व्याख्याने, वैद्यकीय क्षेत्रातील विचारमंथन, गुणवंत डॉक्टरांचा सन्मान आणि संघटनात्मक एकजुटीचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमासाठी सुमन होमिओ फार्मसी, वेणेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

अकलूज शाखेच्या नाट्यप्रवासाची मध्यवर्तीकडून दखल; २०१४ ते २०२६ च्या कार्याचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In