विशेष/ प्रतिनिधी भैय्या खिलारे:

जोवर आई नावाची सावली व बाप नावाची ताकत मुलांच्या पाठीशी आहे तोवरच त्या मुलांनी आपले करीअर घडवावे, आई वडील हे प्रत्येक मुलांसाठी त्यांची कवच कुंडले आहेत, ही कवच कुंडले ज्या दिवशी गळून पडतील त्या दिवशी तुमचा लाड, कौतुक व व अधिकार संपुष्टात येईल म्हणुन मुलांनो आई बापा ला जपा, त्यांच्या मुकवदेना जाणुन घ्या त्यांचा आदर करा शेवटी आई व बाप हेच मुलांसाठी सर्वश्रेष्ठ असतात हे कधीच विसरु नका असे आवाहन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.

सातारा जिल्हाातील म्हसवड पोलीस स्टेशन च्या वतीने युवा पिढीच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात आई बाप समजुन या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे वोलत होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजेत सावंत, कोरेगांव उपविभसं पोलीस अधिकारी तेरणे मॅडम म्हसवडच्या नगराध्यक्षा पुत्रा विरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवीपिसे, स.पो. नि. संदीप पोमण, यासह विविध विद्यालयातील विद्यार्थी, पालक, व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी व्याख्याते वसंत हंकारे यांनी आंई बापा समजुन सांगताना अक्षरशा विद्यार्थ्यांसह, पालक व पोलीसांनाही रडवले, सर्वाना जरी हंकारे यांनी रडवले तरी तुम्हाला आंई बापाने केसे घडवले यावर अतिशयभावनिकरित्या समजावुन सांगताना संपूर्ण परिसर स्तब्ध झाला होता.
पोलीस अधिकारयांसह उपस्थित पालक व विद्यार्थी ही अक्षरशा ओक्साबोक्सी रडले.

ज्यांना आंई, बाप कळले त्याला जिवनाचा अर्थ समजला आहे, तो जिवनात कधीच भरकटला जाणार नाही, मात्र ज्याने ओई, बापाला वात्यांवर सोडले त्यांचे आयुष्यही वात्यांवरच जाणार आहे.”आई – बाप हेच मुलांसाठी सर्वश्रेष्ठ






