स्व.किरण फुके फाऊंडेशन तर्फे बागेचीवाडी गावात श्रमदान
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

बागेचीवाडी ता माळशिरस या गावातील समाजासाठी कायमच कार्यरत असणारा युवक पै किरण शिवाजी फुके याचे एक महिन्यापूर्वी अकस्मात निधन झाले त्यावेळी पुर्ण बागेचीवाडी गाव शोकसागरात बुडाले होते त्यातून सावरत पै किरण फुके याला समाजाप्रती असलेले प्रेम व समाजासाठी आपण काहितरी केलं पाहिजे या निस्वार्थी भावनेला स्मरण गावातील युवकांनी त्याच्या नावाने स्व पै.किरण फुके फाऊंडेशन ची स्थापना करून एक दिवस समाजासाठी या संकल्पनेतून बागेचीवाडी गावात असणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बर्याच दिवसांपासून झालेली अस्वच्छता स्वच्छता अभियान राबवून शाळेच्या आवारात पडलेल्या दगड विटांचे तसेच फरशी चे तुकडे वाढलेली झुडपे काढून गोळा करून व्यवस्थित लावून घेतली

तसेच शाळेच्या आजूबाजूला पडलेले खड्डे मुरूम व माती टाकून मुजवून घेतले त्याच बरोबर पै किरण याने गेल्याच महिन्यात शाळेच्या आवारात काही औषधी वनस्पती लावलया होत्या त्या सर्व झाडांना संरक्षण म्हणून ट्रिप गार्ड बसवून घेतले .
आज पासून प्रत्येक रविवारी गावातील विविध ठिकाणी जाऊन वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प या वेळी उपस्थित सर्वच युवकांनी केला

समाजासाठी गावासाठी आसे सार्वजनिक उपक्रम राबवूनच आपण पै किरण फुके याला खरी श्रध्दांजली आर्पन करू शकतो आशी भावना सर्वांनीच व्यक्त केल्या व दरवेळी राबवण्यात येणार्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे मान्य केले

यावेळी बागेचीवाडी गावातील सर्व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला







