पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वारकऱ्यांना सेवाभावी साथ…

अकलूज, (प्रतिनिधी : )जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने वारकरी भाविकांसाठी सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अकलूज येथे आयोजित या उपक्रमात वारकरी भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, गरम चहा, बिस्किटे तसेच पौष्टिक नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
मोठ्या संख्येने वारकरी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.यावेळी माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.
यावेळी मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई डॉ. बाळकृष्ण गायकवाड, गिरीशदादा एकतपुरे, संतोष इंगळे, संजयतात्या जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत वारकरी सेवेचा हा आदर्श समाजापुढे प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
वारकरी संप्रदायाच्या सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांनी मनापासून स्वागत केले.
“वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा” या भावनेतून भविष्यातही अशा सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.






