• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज शहरात तब्बल ५३९ कोटींच्या विकासकामांना वेग; अंडरग्राऊंड गटर, पाणीपुरवठा, रस्ते, चौक सुशोभीकरणासह अनेक प्रकल्प मार्गी उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
July 13, 2026
in आपले शहर
0
अकलूज शहरात तब्बल ५३९ कोटींच्या विकासकामांना वेग; अंडरग्राऊंड गटर, पाणीपुरवठा, रस्ते, चौक सुशोभीकरणासह अनेक प्रकल्प मार्गी                                              उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज शहरात तब्बल ५३९ कोटींच्या विकासकामांना वेग; अंडरग्राऊंड गटर, पाणीपुरवठा, रस्ते, चौक सुशोभीकरणासह अनेक प्रकल्प मार्गी उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

अकलूज (प्रतिनिधी )अकलूज शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी तब्बल ५३९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गती देण्यात आली असून अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.यावेळी अंडरग्राऊंड गटर, रस्ते, पाणीपुरवठा, बायपास रस्त्याचे सुशोभीकरण, चौकांचे सौंदर्यीकरण, नमो उद्यान, पालखी निधी तसेच इतर विकासकामांची माहिती देण्यात आली.

गेल्या काही वर्षांत अकलूज शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून भविष्यात शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अंडरग्राऊंड गटर योजनेसाठी १२१ कोटींचा निधी

शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी १२१ कोटी रुपयांची अंडरग्राऊंड गटर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण १३० किलोमीटर गटर लाईनपैकी सुमारे ७० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ५ हजार मॅन चेंबरपैकी ३,३०० चेंबर आणि ७ हजार साईड चेंबरपैकी ३,६०० चेंबरचे काम पूर्ण करण्यात आले आहे.याशिवाय ४.५० एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. भविष्यात शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १२ एमएलडी क्षमतेच्या मलजल शुद्धीकरण केंद्रासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

१२० कोटी रुपयांत रस्त्यांचे जाळे मजबूत

अकलूज शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी १२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत १८ किलोमीटर रस्ते आणि ३६ किलोमीटर गटर बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व रस्ते दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

.पाणीपुरवठा योजनेवर २१२ कोटींची मोठी गुंतवणूक

शहरातील भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन २१२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत एकूण १५० किलोमीटर पाणीपुरवठा लाईनपैकी ९० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.७७ फीडर ते विद्रोही तळे या दरम्यान ९ किलोमीटरची स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत असून त्यामुळे शहराला सुमारे १२ महिने नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी जॅकवेल आणि सौरऊर्जेवर आधारित यंत्रणाही उभारण्यात येत आहे

.बॅलन्सिंग टँकची क्षमता तिपटीने वाढणार

शहरातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या २३० एमएलडी क्षमतेचा असलेला जुना बॅलन्सिंग टँक आता ६८० एमएलडी क्षमतेचा करण्यात येणार आहे. हा नवीन आरसीसी बॅलन्सिंग टँक शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येत आहे

.पाच नवीन पाण्याच्या टाक्यांचे काम

शिवाजीनगर, पंचवटी, विद्यानगर, गुलवेनगर आणि राजरत्ननगर या भागांत पाच नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.शिवाजीनगर आणि पंचवटी येथील काम पूर्ण झाले आहे.विद्यानगर आणि राजरत्ननगर येथे काम सुरू आहे.गुळवेनगर येथील काम लवकरच सुरू होणार आहे.यामुळे शहरातील सर्व भागांना समान दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

फिल्टर हाऊसची क्षमता वाढविण्याचे काम

सध्याच्या ६ एमएलडी आणि ८ एमएलडी क्षमतेच्या जुन्या फिल्टर हाऊसऐवजी अधिक क्षमतेचे नवीन फिल्टर हाऊस उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि अखंड राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माळेवाडी परिसरातील ८०० कुटुंबांना दिलासा

माळेवाडीतील शिवाजीनगर, पाटील कॉलनी आणि शांतिनगर परिसरातील सुमारे ८०० कुटुंबांना ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. आता या भागाला आठ ते दहा दिवसांत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच माळेवाडीतील उर्वरित भागालाही लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बायपास रस्त्याचे १७ कोटी रुपयांत सुशोभीकरण

सीआरएफ निधीतून १७ कोटी रुपयांच्या खर्चातून बायपास रस्त्याचे आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे.या प्रकल्पामध्ये—४ किलोमीटर अंडरग्राऊंड स्टॉर्म वॉटर ड्रेनेज४ किलोमीटर युटिलिटी डक्टदोन्ही बाजूंना भूमिगत वायरींगप्रशस्त फुटपाथआकर्षक एलईडी लाईट व्यवस्थावृक्षारोपणडिव्हायडरचे सुशोभीकरणअशा विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

चौकांचे सौंदर्यीकरण

२.५० कोटी रुपयांच्या निधीतून महर्षी चौक, जयसिंह चौक आणि प्रतापसिंह चौक यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील प्रमुख चौक अधिक आकर्षक आणि सुरक्षित बनतील.महर्षी चौकात डेकोरेटिव्ह पोलमहर्षी चौकात ७० लाख रुपयांच्या निधीतून आकर्षक डेकोरेटिव्ह पोल उभारण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे

.पालखी निधी

८० लाख रुपयांच्या पालखी निधीतून मुरूम, खड्डे बुजविणे, लाईट व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नमो उद्यानासाठी १ कोटी

विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे १ कोटी रुपयांच्या खर्चातून नमो उद्यान विकसित करण्यात येत आहे.या उद्यानामध्ये—वॉकिंग ट्रॅकज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालयलहान मुलांसाठी खेळणीयोगा हॉलओपन जिमहिरवळआकर्षक लाइटिंगअशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एकूण ५३९ कोटींचा विकास आराखडा

पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार अकलूज शहरासाठी मंजूर झालेल्या निधीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.अंडरग्राऊंड गटर – १२१ कोटीरस्ते – १२० कोटीपाणीपुरवठा – २१२ कोटीजिल्हा नियोजन निधी – ६४ कोटीसीआरएफ बायपास रस्ता – १७ कोटीचौक सुशोभीकरण – २.५० कोटीनमो उद्यान – १ कोटीपालखी निधी – ८० लाखडेकोरेटिव्ह पोल – ७० लाखएकूण विकास निधी – ५३९ कोटी रुपये.

नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याचा संकल्प

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले की, “अकलूज शहराचा विकास केवळ आजच्या गरजांसाठी नसून पुढील अनेक दशकांचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने केला जात आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा या सर्व क्षेत्रांत दर्जेदार कामे करून अकलूजला आदर्श शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मंजूर झालेली सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.”

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

अवघ्या 3 मिनिटे 39 सेकंदांत 120 अबॅकस प्रश्न सोडवणाऱ्या नंदुरबारच्या प्रनिकाची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In