अकलूजमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर पोलिसांचा दुहेरी छापा; तीन महिलांची सुटका, चार आरोपी अटकेत
अकलूज : अकलूज-महाळुंग रोड परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि अकलूज पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. ७ जुलै २०२६ रोजी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र छाप्यांमध्ये तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन लॉज मालक आणि दोन व्यवस्थापक अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या सलग कारवायांमुळे अकलूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
खाजगी इमारतीवर छापा;
दोन महिलांची सुटकाअकलूज-महाळुंग रोडवरील विनायक आडत यांच्या खाजगी इमारतीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार AHTU आणि अकलूज पोलिसांनी संयुक्त पथक तयार करून सापळा रचला.खात्री करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला २,००० रुपयांच्या चिन्हांकित नोटा देऊन संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्यानंतर मिळालेल्या इशाऱ्यावरून ७ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५.०५ वाजता पोलिसांनी दोन मजली इमारतीवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान इमारतीसमोर बसलेले मालक विनायक काशिनाथ आडत (वय ४०, रा. निमगाव रोड, वेळापूर, ता. माळशिरस) आणि स्वतःला व्यवस्थापक म्हणून सांगणारे महादेव आप्पा चौधरी (वय ३९, रा. आसबेवस्ती, संग्रामनगर, ता. माळशिरस) यांना ताब्यात घेण्यात आले.इमारतीतील दोन खोल्यांची तपासणी केली असता दोन महिला आढळून आल्या.
पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात आणल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यापैकी एक महिला नवी मुंबई, तर दुसरी पुणे येथील रहिवासी आहे.
या कारवाईत बनावट ग्राहकाकडून घेतलेले २,००० रुपये, विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन (अंदाजे किंमत २० हजार रुपये) तसेच १४ सिलबंद निरोध पाकिटे असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
.सहाय्यक पोलीस फौजदार विश्वजीत भाऊसाहेब यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनायक आडत व महादेव चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), १४४, ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.’लयभारी लॉजिंग’वर मध्यरात्री छापा;
आणखी एका महिलेची सुटकादुसऱ्या कारवाईत अकलूज-महाळुंग रोडवरील बडेनगर परिसरातील ‘लयभारी लॉजिंग’ येथे महिलांना डांबून ठेवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
महिला सहाय्यक पोलीस फौजदार सविता कोकणे आणि पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पंचांसह सापळा रचला.एका बनावट ग्राहकाला ५०० रुपयांच्या तीन चिन्हांकित नोटा, म्हणजेच १,५०० रुपये देऊन लॉजवर पाठविण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्यानंतर मिळालेल्या इशाऱ्यावरून ७ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.या कारवाईत लॉज मालक हेमंत नामदेव बडे (वय ५६, रा. बडेनगर, अकलूज) आणि व्यवस्थापक सचिन राजाराम बनसोडे (वय ३५, रा. यशवंतनगर, अकलूज) यांना अटक करण्यात आली
.लॉजमधील एका खोलीत हडपसर (पुणे) येथील ३५ वर्षीय महिला आढळून आली. तिला स्वयंपाकाचे काम देण्याचे आमिष दाखवून लॉजवर बोलावण्यात आले होते.
मात्र, तेथे आल्यानंतर पैशांचे आमिष दाखवत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिची सुरक्षित सुटका केली
.या कारवाईत व्यवस्थापक सचिन बनसोडे याच्याकडून चिन्हांकित १,५०० रुपये, दोन मोबाईल फोन आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असा एकूण २१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
.या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात आरोपी हेमंत बडे आणि सचिन बनसोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), १४४, ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) कायदा (PITA) कलम ३, ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही कारवाया सोलापूर ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि अकलूज पोलिसांनी संयुक्तपणे केल्या.
या धडक कारवायांमुळे अकलूज परिसरातील बेकायदेशीर लॉजिंग व अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास अकलूज पोलीस करीत आहेत.







