बागेचीवाडी गावातील भारनियमन बंद न झाल्यास महावितरण कार्यालयाला घेराव घालणार राजेश्वरी कृष्णराज मानेपाटील लोडशेडिंग विरोधात बागेचीवाडी गावातील रणरागिणींचा यल्गार
अकलूज प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

विजवितरण कंपनी अकलूज कडून बागेचीवाडी गावात सुरु असलेल्या अन्यायकारक लोडशेडिंग विरोधात बागेचीवाडी गावातील रणरागिणींनी यल्गार पुकारत विज वितरण कंपनीच्या अकलूज येथील कार्यालयावर धडक दिली व गावात सुरु असलेल्या अन्यायकारक लोडशेडिंग विरोधात कार्यकारी अभियंता याना निवेदन देऊन गावात गेले तिन महिन्यापेक्षा जास्त दिवस अवेळी (संध्याकाळी ६ते रात्री १० पर्यंत )लोडशेडिंग ताबडतोब बंद करून बागेचीवाडी गावात नियमित विद्युत पुरवठा करावा आशी मागणी केली आहे
संध्याकाळी व रात्री च्या वेळेस लाईट नसल्यामुळे ग्रामीण भागात आनेक आडचणी येतात त्याकडेही सौ.मानेपाटिल यांनी लक्ष वेधून जर लोडशेडिंग बंद करून विज पुरवठा सुरळीत चालू केला नाही तर दोन दिवसात यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला
यावेळी. राजेश्वरी कृष्णराज माने पाटील. ग्रामपंचायत सदस्या इंगळे मॅडम यांच्याबरोबरच गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या
(यावेळी महावितरण कंपनी अकलूज चे कार्यकारी अभियंता यांनी येत्या दोन दिवसात बागेचीवाडी गावातील लोडशेडिंग बंद करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली आहे)







