*डॉक्टर्स दिनानिमित्त वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती व आरोग्य तपासणीचा उपक्रम*
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
टेंभुर्णी, दि. १ जुलै : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून डॉक्टर्स असोसिएशन, टेंभुर्णी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ येथे वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, आरोग्य तपासणी व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असा सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व व प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश देण्यात आला.
तसेच उपस्थितांची एचबीए1सी (HbA1c) तपासणी करून मधुमेहाबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमास डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मदन कांबळे, सचिव डॉ. अमोल माने, उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग गायकवाड तसेच जिल्हा परिषद शाळेचे श्री. अशोक वाघावकर (गुरुजी) प्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेच्या वतीने डॉक्टर्स दिनानिमित्त उपस्थित सर्व डॉक्टरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. सतीश वाघावकर, डॉ. लालासाहेब शेंडगे, डॉ. अमित चोपडे, डॉ. मुकेश मस्तुद, डॉ. रमेश हांडे, डॉ. सचिन खटके, श्री. मारुती मस्तुद (सर), श्री. व सौ. अनंतकवळस रावसाहेब, डॉ. प्रतल कांबळे, डॉ. ज्योती अनंतकवळस, डॉ. सुषमा खटके, डॉ प्रियांका मस्तुद, सौ. अश्विनी साखरे, सौ. मयुरी खोचरे व डॉ. निता गंभिरे यांची उपस्थिती होती
.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर्स असोसिएशनचे सामाजिक उपक्रम प्रमुख डॉ. विनायकराव गंभिरे, डॉ. धनाजी खताळ व डॉ. मिनाक्षी गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.






