इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील रस्त्यालगतच्या विहिरीमुळे अपघाताचा धोका; संरक्षण भिंत उभारण्याची नागरिकांची मागणी
इंदापूर (प्रतिनिधी )इंदापूर तालुक्यातील उद्धट मानकरवाडी ते कर्दनवाडी हा सुमारे ८ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ५ कोटी रुपये खर्चून मे. व्ही. एच. खत्री कन्स्ट्रक्शन प्रा. लि., बारामती या ठेकेदारामार्फत दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आला.

मात्र, या रस्त्याच्या अनेक ठिकाणी अद्यापही साईडपट्ट्या नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
याच रस्त्यावरील पवारवाडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला, अगदी वळणावर एक विहीर आहे. या ठिकाणाहूनच गावात जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने ग्रामस्थ, शेतकरी तसेच शाळकरी मुले दररोज या मार्गाचा वापर करतात.
मात्र, विहिरीभोवती कोणतेही सुरक्षित कंपाऊंड किंवा संरक्षण व्यवस्था नसल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे दत्तनगर, करकरे वस्ती या ठिकाणी देखील विहीर आहे.
कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने दोन्हीही विहिरीभोवती मजबूत संरक्षण भिंत (कंपाऊंड) उभारावी, तसेच रस्त्यावरील साईडपट्ट्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी पवारवाडी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे
.#इंदापूर #पवारवाडी #प्रधानमंत्रीग्रामसडकयोजना #रस्तेसुरक्षा #साईडपट्टी #विहीरसुरक्षा #शाळकरीमुले #नागरिकांचीमागणी #ग्रामीणविकास #रस्त्यावरीलधोका #सुरक्षितप्रवास #इंदापूरतालुका #महाराष्ट्र







