पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
चाकोरे प्रतापनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता डी.सी.सी. बँक समोर, चाकोरे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्व, दूरदृष्टी आणि समाजकल्याणकारी योगदानावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजमाता प्रतिष्ठान, चाकोरे प्रतापनगर व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इतिहासातील या सुवर्णपानाचा गौरवपूर्ण वारसा जाणून घेण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







