संग्रामनगर येथील समस्यांवर नागरिकांची जोरदार नाराजी; आंदोलनाचा इशारा
अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर, येथील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन भैय्या लोखंडे यांच्या पुढाकाराने मदन महाराज हॉल येथे 3मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक अडचणी मांडल्या.
विशेषतः रस्त्यांची दयनीय अवस्था, गटारांची समस्या, अपुरा वीजपुरवठा व पाण्याचा तुटवडा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या नाहीत, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
या प्रसंगी सचिन भैय्या लोखंडे, पै. हंसराज घुले, तेजस ढवळे, सुबोध वाघमारे, निखिल भोसले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते
.#संग्रामनगर#नागरिकांच्या_समस्या#स्थानिक_प्रश्न#रस्ते_गटार_पाणी#वीज_पाणी_प्रश्न#आंदोलनाचा_इशारा#प्रशासन_जागे_हो#जनआक्रोश#सामाजिक_कार्य#सचिन_भैय्या_लोखंडे#नागरिकांचा_आवाज#स्थानिक_बातम्या#MaharashtraNews#LocalIssues#PublicVoice






