माळशिरस (प्रतिनिधी )
. माळशिरस तालुका महिला बाल विकास अधिकारी ( सी डी पी ओ) असमा कमाल आतार मॅडम यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल तर्फे राज्यस्तरीय” फतीमा शेख” हा आदर्श अधिकारी म्हणून हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आसमा आतार यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून करत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी, समाज उपयोगी आणि उल्लेखनीय असल्याने तसेच त्यांनी जिद्द चिकाटी मेहनत आणि कर्तव्यदक्षपणामुळे अनेक कुटुंबांची जीवन समृद्ध केले. त्यांच्या कार्याची ओळख म्हणून ही पोहोच पावती त्यांना मिळालेली आहे.
चौकट :-
मला हा पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे व माझा हा पुरस्कार तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना समर्पित असल्याचे सांगितले. या पुरस्काराने आणखी जबाबदारीची जाणीव व संवेदनशीलता याही पुढे कामात सातत्य ठेवणार असल्याचे सांगितले. या पुरस्काराने ऊर्जा मिळाल्याने भविष्यात याही पेक्षा जास्त समाजाची सेवा करणार. असमा आतार.






