इंदापूर तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे
इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातून श्रींची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली गावातील सर्व स्वामीभक्त महिलांनी चौका चौकामध्ये रांगोळी काढून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे स्वागत केले तसेच महादेव भजनी मंडळ यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता
पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर आठ ते नऊ या वेळेमध्ये ह.भ. प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज पंढरपूर यांचे स्वामी चरित्र प्रवचन झाले नंतर जप व आरती संपन्न झाली

नंतर सर्व स्वामी भक्तांना श्री आप्पासाहेब तुळशीराम बोंद्रे यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला
या कार्यक्रमास सर्व स्वामी भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच रांगोळीची सेवा सौ शितल सुनील सुतार यांच्याकडून झाली तसेच रांगोळीसाठी फुलांची सेवा श्री महादेव मारुती माळी यांच्यातर्फे देण्यात आली प्रवचन सेवेचे मानधन श्री राजाराम संभाजी जाधव यांच्याकडून देण्यात आले.
तसेच निमसाखर गावचे दिव्यांग पत्रकार कु. गणेश धनवडे यांना स्वामी सेवा पुरस्कार ह.भ. प. श्री रेवणसिद्ध सलगर महाराज यांच्या हस्ते देण्यात आला.






