*माळशिरसमध्ये शाळेत शिक्षकांमध्ये वाद; विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण* *क्रमशः भाग -1*
माळशिरस (प्रतिनिधी )माळशिरस शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये दोन शिक्षकांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित घटनेमुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाळेच्या शिक्षक कक्षात घडली.
दोन शिक्षकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला; मात्र काही वेळातच हा वाद तीव्र होत जाऊन एकमेकांना धराधरी करण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली.
विशेष म्हणजे, ही घटना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घडल्याने तिचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर झाला.वाद इतका मोठ्या आवाजात सुरू होता की, वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांनाही भांडणाचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांमध्येही शाळेच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त होत असून, संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
ही शाळा माळशिरस तालुक्यातील एक जुन्या व प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जाते. सुरुवातीच्या काळात या संस्थेतील शिक्षकांना नियमित पगार नसतानाही त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत समर्पणाने शिक्षण दिले होते.
त्यामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि नाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले होते.मात्र, सध्याच्या परिस्थितीबाबत काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे
. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या काही शिक्षकांना पूर्ण पगार मिळत असताना काहींना केवळ २५ ते ५० टक्क्यांपर्यंतच मानधन दिले जाते.
या परिस्थितीमुळे शिक्षकांच्या अध्यापनातील सातत्य आणि गुणवत्ता यावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
तसेच, ‘जादा तास’ या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचेही सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या जादा तासांमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम नियमित वर्गात पुन्हा शिकवला जात नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, समान शिक्षणाच्या संधीबाबत प्रश्न निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर, “जादा तासांना हजर राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
या सर्व प्रकारामुळे शाळेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, काही पालकांनी शिक्षकांच्या वर्तनाबाबतही चिंता व्यक्त केली आहे. शिक्षकांनी आचारसंहिता पाळणे अत्यंत आवश्यक असून, विद्यार्थ्यांसमोर अयोग्य वर्तन झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले
. “विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनीच जर मर्यादा ओलांडल्या, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात,” असेही एका पालकाने सांगितले
.या घटनेनंतर संबंधित संस्थेकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, शिक्षण विभाग याबाबत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. *क्रमशः भाग -1* #माळशिरस #ज्ञानमंदिर #शिक्षकवाद #शाळेतीलप्रकार #विद्यार्थीसुरक्षा #BreakingNews #SchoolNews #EducationCrisis #TeacherFight #ViralNews #EducationMatters #StudentSafety #SchoolEnvironment #RightToEducation #EducationSystem #शिक्षणव्यवस्था #पालकांचाप्रश्न #विद्यार्थ्यांचाभविष्य #शिक्षणविभाग #Accountability #SpeakUp #NeedAction #PublicVoice #RealityCheck #Awareness







