लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी जागा द्या – किरण भांगे
अकलूज/प्रतिनिधी :- मौजे-चाकोरे ता.माळशिरस या गावामध्ये लिंगायत समाज वास्तव्यास आहे.
यामध्ये लिंगायत- (कुंभार),लिंगायत-वाणी(कस्तुरे),लिंगायत-जंगम(स्वामी) या जात समूहाची कुटुंबे आहेत.
सदर लिंगायत समाजाच्या पारंपरिक चालीरीती प्रमाणे गावात स्वतंत्र दफनभूमी नाही.यासाठी भविष्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने कुंभार,वाणी,जंगम समाजासाठी दफनभूमीसाठी चक्रेश्वर मंदिर लगत कमाल जमीन उपलब्ध करून द्यावी.
यासाठी आगामी ग्रामसभेत ठराव पारित करून सद्यस्थितील जागेची गाव नमुना नं.8 (मालमत्ता पत्रक)मध्ये तात्काळ नोंद प्रमाणित करावी,अशी मागणी क्रांतीमित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण भांगे यांनी ग्रामसेवक भालेराव यांचेकडे निवेदनाद्वारे केली असून आगामी काळात ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत,असे सांगितले आहे.






