बारामती येथे १६ एप्रिलरोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन
बारामती (प्रतिनिधी ): सकल हिंदू समाजाच्या वतीने बारामती येथे ‘विराट हिंदू संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एम.ई.एस. हायस्कूल (मुलांचा विभाग), बारामती येथे होणार आहे.या संमेलनात हिंदू एकता, राष्ट्र सुरक्षितता तसेच संविधान संरक्षण यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन समाज संघटित करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमासाठी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, प्रखर हिंदुत्ववादी नेते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, विक्रम जगताप, कथाकार अभय ठकार तसेच वक्त्या कु.जागृती अयाचित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.






