गारअकोले येथे कार्तिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
गारअकोले(प्रतिनिधी )ता. माढा, जि. सोलापूर — गारअकोले परिसरातील पालकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कार्तिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
Nursery, Jr. KG व Sr. KG या वर्गांसाठी प्रवेश उपलब्ध असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी ही शाळा पालकांच्या पसंतीस उतरत आहे.शाळेचा आकर्षक व सुरक्षित परिसर, अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षकवर्ग तसेच आधुनिक डिजिटल क्लासरूम ही शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्टपणे समजावून देण्यावर विशेष भर दिला जातो. याशिवाय आर.ओ. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सुरक्षित स्कूल बसची सोयही उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दैनंदिन व मासिक सराव परीक्षा घेतल्या जातात. क्रीडा व शारीरिक विकासाला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवले जातात.
तसेच शैक्षणिक क्षेत्रभेटी, हॉबी क्लब (स्वच्छंदी वर्ग) आणि अबॅकस (वैदिक गणित) प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि सर्जनशील विकास साधला जातो.
शाळेची कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० अशी असून, इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा,
असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे
.अधिक माहितीसाठी माने सर (७७७६०५९१२६), लावंड सर (७८२३०२१९०७), पवार सर (७४४७८५३४३३), जाधव मॅडम (७०५८७२९५९५) व पवार मॅडम (८१४९३६५०९२) यांच्याशी संपर्क साधावा.







