इंदापूर (प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील अकलूज नाका परिसरातील एका खासगी अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांवर कथित मारहाणीचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे
. संबंधित अकॅडमीचे संचालक विद्यार्थ्यांना विनाकारण PVC पाइपने मारहाण करीत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना वारंवार शारीरिक शिक्षा दिली जात असल्याचे सांगितले जाते.
विशेषतः बारावीच्या ८ ते १० विद्यार्थ्यांना मागील वर्षीही अशाच प्रकारे मारहाण झाल्याची चर्चा आहे.
या घटनेनंतर काही पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन संबंधित संचालकांना जाब विचारला होता. तसेच त्यांना कडक शब्दांत समज देण्यात आल्याची माहिती आहे.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी परिस्थितीत ठोस बदल झालेला नसल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
काही वेळा संबंधित व्यक्ती माफी मागतात, मात्र नंतर पुन्हा अशाच प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर या प्रकारांचा गंभीर परिणाम होत असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आपल्या पाल्यांना अशा संस्थेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांनी काळजीपूर्वक विचार करावा, असे आवाहनही काही पालकांनी केले आहे. *क्रमशः भाग-1 #Indapur#AklujNaka#StudentSafety#StopViolence#EducationSystem#ChildRights#ParentsVoice#SchoolAbuse#SpeakUp#
*संघर्ष योद्धा चे आवाहन*
इंदापूर तालुक्यात समोर आलेल्या विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष योद्धा संघटनेतर्फे सर्व पालक व विद्यार्थ्यांना गंभीर आवाहन करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक शिक्षा ही अजिबात सहन केली जाणार नाही. शिक्षणाच्या नावाखाली जर कुठेही अन्याय, छळ किंवा अत्याचार होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
👉 *पालकांना आवाहन:*
आपल्या पाल्यांच्या वर्तनात भीती, तणाव किंवा बदल जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. संबंधित संस्थेकडे जाब विचारावा आणि आवश्यक असल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. एकटे न लढता एकत्र या
👉 *विद्यार्थ्यांना आवाहन:*
भीती बाळगू नका. तुमच्यावर अन्याय होत असेल, तर तो सहन करू नका. आपल्या पालकांना, विश्वासू व्यक्तींना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कळवा. तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. 👉 *सर्वांसाठी संदेश:*
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हेच खरे धैर्य आहे. अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.“शिक्षणासाठी शिस्त हवी, पण शिस्तीच्या नावाखाली छळ कधीच मान्य नाही!” ✊







