बागेचीवाडीतील नागरिक त्रस्त; संध्याकाळच्या भारणीयमनामुळे चोरीचा फटका
बागेचीवाडी (रणजितदादा गायकवाड )माळशिरस तालुक्यातील बागेचीवाडी गावात काही दिवसांपासून संध्याकाळी ६ ते १० या वेळेत भारणीयमन होत असल्याने नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत.
या काळात वीज पुरवठा अनियंत्रित होणे, तसेच सामान्य दैनंदिन कामकाजात विघ्न निर्माण होणे यामुळे गावातील लोक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या वेळेत चोरीसारख्या घटनांमध्येही वाढ झाली असून, सुरक्षा प्रश्न गंभीर ठरला आहे. शेतकरी म्हणतात की, त्यांच्या शेतातील कामकाजावरही याचा थेट परिणाम होत आहे.गावातील नागरिक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यामध्ये भारणीयमन वेळा नियंत्रित करणे, संध्याकाळी सुरक्षा वाढवणे आणि नागरिकांना अडचणींपासून मुक्त करणे या उपाययोजना अपेक्षित आहेत.सध्या शै परिक्षेचा कालावधी आसल्यामुळे विध्यार्थी विद्यार्थीनीना आभ्यासात व्यत्यय येतोय याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे
ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर नागरिकांचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
लवकरच बागेचीवाडी गावातील सर्व ग्रामस्थ महावितरण च्या विरोधात आंदोलन करणार आहेत






