संघर्ष योद्धा न्यूज नेटवर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी आगवणे मो 8698835550
50 वर्ष पूर्वीची ची जुनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगवी गाव येथील शाखा सत्ताधारी पक्षांनी अतिक्रमण अधिकाऱ्यावर दबाव आणून पाडण्यात आली
याची कल्पना देण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पक्षाची पडझड याचा आढावा मीटिंग आयोजित करण्यात आली होती
यात शहरातील शिवसेना सर्व पदाधिकारी शिवदूत माजी नगरसेवक ज्येष्ठ शिवसैनिक यांनी यासंदर्भात उद्धव साहेबांना वेळ मागितली होती सांगवी तील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून शिवसेना शाखा पाडल्याचे कळल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी तात्काळ वेळ देऊन चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख मा श्री विजयजी सुळे यांना तात्काळ सांगण्यात आले पिंपरी चिंचवडला जाऊन आयुक्त आणि महापौर स्थानिक कार्यकर्ते घेऊन निवेदन देण्यात यावे व शिवसेनेच्या वतीने कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी
ज्या नगरसेवकांनी पिंपरी चिंचवड शहरात व सांगवी विभागात अतिक्रमण करून स्वतःचे कार्यालय व इतर कार्यालय. व पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य ऑफिस अतिक्रमण करून मांडण्यात आले व ज्या नगरसेवकांनी अनाधिकृत बांधकाम व्यवसाय या त्यांचा भाग आहे अथवा यांच्या नातेवाईकांच्या नावाने प्लॅन न पास करता अनाधिकृत बांधकाम व्यवसाय सुरू आहे अशा नगरसेवकांवर कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी
यात सहभाग घेताना श्री मोहन बारटक्के शिवदूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र






