हिंजवडीत तीसऱ्यांदा मुळशीरत्न पुरस्कारांचे वितरण!
पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी आगवणे 86988 35550
आय टी नगरीतील हिंजवडीत यंदा तीसऱ्यांदा मुळशीरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हिंजवडी येथील डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटरच्या वतीने हिंजवडी ग्रामपंचायतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुळशी रत्न २०२६ गौरव मुळशीकरांचा या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू संस्थांना चे अध्यक्ष श्री. ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, प्रमुख पाहुणे मुळशी तालुका सभापती सौ. मंदाताई बाबाजी शेळके, ह.भ.प. नितीन महाराज मोरे, ह.भ.प.श्री.शेखर महाराजजांभूळकर, हिंजवडी चे माजी सरपंच श्री मल्हारीशेठ साखरे, माजी सरपंच सौ.मनिषाताई हुलावळे, हिंजवडी ग्रामपंचायती च्या सदस्या सौ.पल्लवीताई गंगावणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला पोलिस इन्स्पेक्टर अनिल हागवणे साहेब, ह.भ.प.शिवाजीराव जाधव पाटील, संतोष बोत्रे ( सामाजिक कार्यकर्ते ), आदिनाथ काळोखे, देवीदास जाधव पाटील, उद्योजक विजय मारणे ,श्री.विलास नढे ( विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष काळेवाडी ),विकास कापसे ( युवा उद्योजक ), श्री. विशाल मारणे ( चार्टर्ड अकाउंट), श्री. महेश गोरे ( निवेदक ), मनसे चे तालुका अध्यक्ष श्री.गणेश शिंदे, श्री.निलेश जांभूळकर ( युवा उद्योजक ), श्री. नितीन जांभूळकर ( अध्यक्ष विद्या व्हॅली शाळा ) श्री. श्रीकांत काकडे ( युवा उद्योजक) , जि.प.प्राथ. हिंजवडी शाळेचे मुख्याध्यापक श्री येळे सर, इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी मुळशी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुळशी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला,
यामध्ये ह.भ.प.श्री. सीताराम नारायण मातेरे ( सांप्रदायिक ),श्री. रामदास विठोबा जांभूळकर ( कृषिरत्न ), सौ. उज्वला उमेश पारखी आणि सौ सुलभा रवींद्र उनकुले ( महिला गौरव पुरस्कार), सौ.सोनाली विठ्ठल चव्हाण ( आदर्श सरपंच),श्री.नंदकुमार ज्ञानदेव ढाणे (सेवा), श्री.भास्कर केशवराव घोरपडे ( आदर्श शिक्षक), श्री.विनोद संपत जाधव ( उद्योग रत्न) श्री संजय सोमाजी देवकर ( समाज भूषण ),श्री.पांडुरंग आनंदा बोडके.( क्रीडा रत्न ), श्री.बाबासाहेब सीताराम तारे ( पत्रकार रत्न ), तसेच कराटे या खेळामध्ये तालुका ते अंतरराष्ट्रीय पातळीवर डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर च्या मुला मुलींनी विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल मुळशी गुणगौरव सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बिपिन देशमुख सर यांनी केले, सूत्र संचालन तुळशीराम घोलप सरांनी केले तर डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर चे अध्यक्ष श्री नितीन काकडे यांनी आभार मानले.






