अकलूज पोलीस ठाण्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
अकलूज : दिनांक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अकलूज पोलीस ठाणे येथे सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रेश्माताई आडगळे, महिला नगरसेवक, अकलूज पोलीस ठाणे येथील महिला पोलीस पाटील, महिला होमगार्ड, महिला दक्षता समितीतील डॉक्टर, वकील, शिक्षक, समाजसेविका तसेच पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ तसेच फुलांचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपले अनुभव मांडत महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
तसेच महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरण या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमामुळे उपस्थित महिलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.







