*माती, नाती आणि संस्कृती जपणाऱ्या निमगावला सभापतीपद मिळावं — एक निमगावकर … *रणजितदादा गायकवाड *
निमगाव (मगराचे)* … तीन-चार जिल्ह्यांत ओळख असलेलं गाव. पीक पाण्यान अन समृद्धीने नटलेलं गाव. स्वातंत्र्यासाठी झुंज देणाऱ्या *देशभक्तांचं गाव*. *महाराष्ट्र केसरी आणि ऑल इंडिया किताब जिंकणाऱ्या पैलवानांच अन कुस्तीची परंपरा जपणाऱ्या मल्लसम्राटांचं गाव*. सैनिकांपासून ते कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपर्यंत राष्ट्रसेवेची परंपरा जपणारं गाव. निर्यातक्षम पिकांचे प्रयोग करणाऱ्या कष्टाळू आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचं गाव.*लेखकांचं, विचारवंतांच गावं*
काही वर्षांपूर्वी *दिल्लीच्या* राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात *‘गजीढोल’* या लोककलेच्या माध्यमातून *महाराष्ट्राचं नेतृत्व करणार गावं.* सर्वांनाच हेवा वाटावं आण गावकऱ्यांना अभिमान वाटावा असं आमचं निमगाव
.या गावाचा गावगाडा कै.नानासाहेब मगर, कै.कृष्णात मगर, कै.आप्पा तात्या आणि कै.आगतराव पाटील यांसारख्या मोठ्या मनाच्या माणसांनी वर्षानुवर्षे सांभाळला. राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर निमगाव नेहमीच *देण्याच्या भूमिकेत* राहिलं आहे.*मोहिते पाटील* कुटुंबावर कायम एकनिष्ठ राहून या गावाने सामान्य लोकांसाठी *संघर्ष करणारे आमदार उत्तमराव जानकर* यांचाही स्वाभिमान जपला आहे.
याचं एक मोठं उदाहरण म्हणजे २५-30 वर्षांपूर्वीची घटना. कै.नानासाहेब मगर पंचायत समिती सदस्य झाले तेव्हा *विजयदादांनी त्यांना उपसभापती होण्याची ऑफर दिली होती*. पण नानासाहेब मगर यांनी नम्रपणे सांगितलं –“मी तुमचाच आहे. नव्याने निवडून आलेल्या गरीब कुटुंबातील *माणिकराव बाबासाहेब करनवर या कार्यकर्त्याला उपसभापती करा*; तो उपसभापती झाला म्हणजे मी उपसभापती झालो.”हीच आमच्या गावाची संस्कृती आहे… स्वतःपेक्षा इतरांना पुढे करण्याची.*मा.के.के. पाटील* यांनीही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत काम केलं; मात्र त्यांनाही सभापतीपदाची संधी मिळाली नाही.
आता नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत निमगाव पंचायत समिती गणातून गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा युवक, *पै.दत्तात्रय मगर* *विक्रमी ३३३० मतांनी* निवडून आला आहे.आजच्या जातीय राजकारणाच्या काळात सर्वांसाठी उपलब्ध असणारा, *जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा तरुण म्हणून दत्ता भैयांची तालुक्यात ओळख आहे*. स्वतःच्या संघटन कौशल्यावर त्यांनी युवकांचं मोठं जाळं उभं केलं आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी हक्काने लढणारा हा तरुण आज *निमगावचा चेहरा* बनत आहे
.आज पंचक्रोशीतल्या माय-माऊली, तरुण आणि वडीलधारी मंडळींची एकच भावना आहे *“दत्ता भैया सभापती झाले पाहिजेत.”*मोहिते पाटील कुटुंबाला *नेते घडवणारी फॅक्टरी* म्हणून ओळखलं जातं, तर *आमदार उत्तमराव जानकर* हे काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेते आहेत.म्हणूनच यंदा मोहिते पाटील – जानकर परिवाराशी *कायम एकनिष्ठ राहिलेल्या आमच्या निमगावच्या पदरात सभापतीपद द्यावं*, अशी प्रत्येक सामान्य माणसाची अपेक्षा आहे.कारण हे फक्त पद नाही…ही आमच्या गावाची प्रतिष्ठा आहे,त्या मातीचा सन्मान आहे,आणि *तुमच्याशी एकनिष्ठ असललेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे**माती, नाती आणि संस्कृती जपणाऱ्या निमगावला सभापतीपद मिळावं — एवढीच अपेक्षा*- —– एक निमगावकर






