*अकलूज–वेळापूर रस्त्यासाठी संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलची वृत्तमालिका; नागरिकांचा वाढता प्रतिसाद* *क्रमशः भाग -20.*
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज ते वेळापूर या राज्य महामार्गावरील खराब रस्त्याच्या समस्येबाबत संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या वृत्तमालिकेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
१५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या वृत्तमालिकेत रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यातून निर्माण होणारा अपघातांचा धोका आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याकडे सातत्याने लक्ष वेधण्यात येत आहे.दररोज या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, शेतकरी, व्यापारी तसेच स्थानिक नागरिक या समस्येमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
अनेक वेळा अपघात होण्याच्या घटना घडल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल करत आहे.
या वृत्तमालिकेमुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असून अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच विविध स्तरांवरील लोकांकडून या वृत्तमालिकेला पाठिंबा मिळत आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी या उद्देशाने संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलचा हा प्रयत्न पुढेही सुरू राहणार आहे.
*नागरिकांच्या प्रतिक्रिया.*
:-1.➡️*धाडसी पत्रकारितेचा आदर्श : गणेशजी जाधव यांची रस्त्याच्या समस्यांवर परखड वृत्तमालिका*
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. समाजातील प्रश्न निर्भीडपणे मांडणे आणि जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे पत्रकारांचे महत्त्वाचे कर्तव्य मानले जाते.
आजच्या जाहिरातींच्या आणि विविध दबावांच्या युगातही कोणत्याही आमिषाला किंवा दमदाटीला बळी न पडता निर्भीड पत्रकारिता करणारे पत्रकार अजूनही समाजात आहेत, याचे उदाहरण म्हणजे माझे गुरु श्री. गणेशजी जाधव.
संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी अकलूज ते वेळापूर या राज्य महामार्गावरील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधणारी वृत्तमालिका १५ फेब्रुवारीपासून सुरू केली आहे.
या महामार्गावरील खड्डे आणि त्यातून निर्माण होणारा अपघातांचा धोका हा अनेक दिवसांपासून नागरिकांसाठी मोठा त्रासदायक विषय ठरला आहे.
मात्र, अनेक संघटना, पक्ष आणि काही पत्रकारांनी दुर्लक्षित केलेला हा विषय जाधव यांनी अत्यंत परखड आणि निर्भीडपणे मांडण्याचे धाडस दाखवले आहे.कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही ते केवळ जनतेच्या हितासाठी सातत्याने हा प्रश्न मांडत आहेत.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात थांबावेत, कोणाला दुखापत होऊ नये किंवा कोणाचा जीव जाऊ नये यासाठी ते निस्वार्थपणे प्रयत्न करत आहेत.आजच्या काळात अशी निस्वार्थ आणि जनतेसाठी लढणारी पत्रकारिता दुर्मिळ होत चालली आहे.
गणेशजी जाधव यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या धाडसी पत्रकारितेला मानाचा मुजरा करावा लागेल.

— *रणजितदादा गायकवाड* *मु.पो. बागेचीवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर*मो. 7028873111.
:-2➡️*जनतेचा आवाज, संघर्षाचा ध्यास; ‘संघर्ष योद्धा’चा रस्त्यासाठी अट्टाहास!*”
हा नारा केवळ शब्दांचा खेळ नसून जनतेच्या मनातील वेदना, अपेक्षा आणि विकासाच्या लढ्याचे प्रतीक आहे.
गावाचा विकास हा चांगल्या रस्त्यांपासूनच सुरू होतो. रस्ता हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून शिक्षण, आरोग्य, शेती आणि व्यापार यांना जोडणारी जीवनवाहिनी आहे.
त्यामुळे रस्त्याचा प्रश्न हा गावाच्या सर्वांगीण प्रगतीशी थेट जोडलेला आहे.आजही अनेक गावांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो, ही दुर्दैवी बाब आहे.
मात्र अशा परिस्थितीत जनतेचा आवाज बुलंद करून प्रशासनाचे लक्ष वेधणारे आणि गावाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे ‘संघर्ष योद्धा’न्यूज पोर्टल चे संपादक, आमचे दैवत गणेश जाधव हे समाजासाठी प्रेरणादायी ठरतात.
लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यासाठी ठामपणे उभे राहणे हे खऱ्या सामाजिक बांधिलकीचे लक्षण आहे.रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी सुरू असलेला हा त्यांचा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाच्या विकासाचा लढा आहे.
जनतेच्या पाठिंब्याने आणि सामूहिक प्रयत्नांनी हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल, असा मला विश्वास आहे. गावाच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल च्या या संघर्षाला माझा मनापासून पाठिंबा आहे.

— *आबासाहेब गोसावी* *सामाजिक कार्यकर्ते, खंडाळी*मो.83080 50254.
रस्त्याच्या समस्यांवरील निर्भीड पत्रकारितेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली वृत्तमालिका जनतेचा आवाज बुलंद करणारी ठरत असून समाजातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेला हा संघर्ष प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ जनहितासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे नागरिकांनी म्हटले असून या उपक्रमाला व्यापक पाठिंबा मिळत आहे
.#संघर्षयोद्धा#निर्भीडपत्रकारिता#जनतेचाआवाज#रस्त्यासाठीसंघर्ष#अकलूजवेळापूरमार्ग#खड्डेमुक्तरस्ता#सुरक्षितप्रवास#लोकहिताचीपत्रकारिता#समाजहित#महाराष्ट्रन्यूज#गणेशजाधव *क्रमशः भाग -20.*
🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील गंभीर समस्यांविरोधात १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहे. 👥 नागरिकांची व्यथा स्पष्ट आहे —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!”खड्डे, अपूर्ण कामे, उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि वाढता अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. रुग्णवाहिकांनाही वेगाने धावणे कठीण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!” 🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण आणि सुरक्षित होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम होईपर्यंत सातत्याने प्रश्न विचारले जातील. ➡️ या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी आपले अनुभव, तक्रारी व सूचना आम्हाला पाठवा.हा लढा आपल्या सर्वांचा आहे. 📲 ७८४१८४७४५८. ✊ *एकत्र येऊया, आवाज बुलंद करूया!* *खड्डेमुक्त रस्ता हा आमचा हक्क आहे!*






