दत्तनगर येथे भजन व भोजन संध्या कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
रविवार दिनांक १/०३/२०२६ रोजी दत्तनगर येथील थिटे परिवाराच्या घरी सारंग संगीत विद्यालयाचा भजन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात सारंग विद्यालय खंडाळी शाखेतील वीस विद्यार्थी सहभागी झाले
या कार्यक्रमात सारंग विद्यालय खंडाळीचे सर्वेसर्वा आदरणीय झांबरे सर, झांबरे मॅडम, मधुरा झांबरे व सारंग झांबरे यांची उपस्थिती होती
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या रसिक वाणीतून वातावरण भक्तिमय केले व आपल्या गायन, वादनाने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे आयोजन विनोद थिटे परिवारातर्फे करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना भेट म्हणून पेन देण्यात आला
सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेल भक्तिमय गीते गायली त्यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले होते व एक पॉझिटिव्ह वाइब वातावरणात आला होता
.कार्यक्रमासाठी परिसरातील सर्वच महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सांगता पताळे सर लिखित व झांबरे परिवारांनी संगीतबद्ध केलेल्या तसेच झांबरे मॅडम यांनी गायलेल्या”माझा छत्रपती शिवाजी राजा” या जोशपूर्ण गीताने झाली यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व श्रोत्यांना रुचकर भोजन देण्यात आले
. सुनील पताळे सर, लखन साठे सर व गोसावी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
.थिटे परिवारातील सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






