*
अकलूज (प्रतिनिधी )संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल च्या वतीने अकलूज–वेळापूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत १५ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या वृत्तमालिकेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सलग १७ भागांमध्ये या रस्त्याची बिकट अवस्था, अपघातांची मालिका, प्रवाशांना होणारा त्रास आणि प्रशासनाची उदासीनता यावर सखोल प्रकाश टाकण्यात आला.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने वेळापूर ते सत्कार हॉटेलपर्यंत तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मात्र सत्कार हॉटेल ते अकलूज हा उर्वरित भाग अद्यापही दुरुस्त व्हायचा आहे.
*नागरिकांच्या प्रतिक्रिया*
:-1➡️*सामाजिक बांधिलकी जोपसणारा पत्रकार*
.सन्माननीय पत्रकार श्री गणेश जाधव सो.प्रथमतः सामाजिक बांधिलकीसाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद !
आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपल्या संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल द्वारे १५ फेब्रुवारी पासून ते ३ मार्च पर्यंत एकूण १७ भागात क्रमशः पद्धतीने अकलूज वेळापूर या रस्त्याची झालेली दुरवस्था अतिशय मार्मिकपणे व अभ्यासपूर्ण शैलीने मांडून प्रशासनाला रस्त्याची तात्पुरती डागडूजी करण्यासाठी भाग पाडले
.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांना अपंगत्व आले, काहींना प्राण गमवावा लागला, काहींना दुखापतीमुळे शारीरिक त्रास व आर्थिक त्रास सोसावा लागला.आपण संघर्ष योद्धा च्या माध्यमातून १७ भागातील केलेल्या योग्य परिस्थितीजन्य मांडणीतून प्रशासनाकडून वेळापूर पासून ते सत्कार हॉटेलपर्यंत खड्डे भरून घेण्याचे काम केलेले आजच पाहिले.
सत्कार हॉटेल पासून अकलूज पर्यंत चा भाग अजून राहिला आहे.आपण बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनास हे नजरेस आणून दिले त्यामुळेच हे शक्य झाले आहे. तरीपण तात्पुरती मलमपट्टी तथा डागडुजी न होता कायमस्वरूपी व अनेक वर्ष रस्त्यांचे मजबुतीकरण होण्याच्या दृष्टीने असाच पाठपुरावा आपल्याकडून व्हावा ही समाज दृष्टिकोनातून विनंती.
आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रवासीधारक, वाहन चालक व वाहक यांचे शारीरिक व्याधी, गाड्यांचे होणारे नुकसान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्ण तथा गर्भवती महिला यांची प्रवासाची काळजी आदीं बारीक सारिक बाबींवर भर देत केलेल्या या पाठपुराव्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

*गजानन रजनी ज्ञानेश्वर जवंजाळ* *भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट*, *अकलूज*
2:-➡️*रस्त्यासाठी पत्रकारांचा लढा*
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना मानले जाते.आपले पत्रकार बंधू श्री गणेश जाधव साहेब अनेक दिवसापासून या रोड साठी संघर्ष करत आहेत
खूप मोठ्या अंतकरणांनी खूप परिश्रम करत आहेत.परंतु कोणीही त्यांची दखल घेतली जात नाही जाधव साहेबांचा एकच उद्देश आहे त्यांची एक तळमळ आहे की,कोणाच्याही घरामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण होऊ नये.
त्या रोडवरून येता जाता कोणाचा अपघाताने घरातला आधार जाऊ नये. एवढ्या तळमळीने ते प्रयत्न करत आहेत त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचे आहे.
या सरकारला जागे करण गरजेचे आहे. साधा एक रोड किती अंतर आहे तो रोड पूर्ण खड्डे बुजवता येत नाही.सर्वसामान्यांचे तर ऐकतच नाहीत आज पत्रकार बंधू जाधव साहेबांनी एवढ्या तळमळीने प्रयत्न करतात. कोणीही दखल घेत नाहीत का आणि कशासाठी?

*सोमनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते. नवीन बाजारतळ. अकलूज*
3:-➡️*एक उमदा व निर्भीड पत्रकार
-गणेश जाधव*पत्रकार गणेशराव आपलं पहिल्यांदा तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे
खऱ्या अर्थाने आपण बाळशास्त्री जांभेकरांना अभिप्रेत असणारी पत्रकारिता आजच्या घडीला निभावत आहात. एखादा विषय कसा हाताळायचा व त्या विषयाची व्याप्ती कशी वाढवायची याचे सखोल ज्ञान आपणास असल्यामुळे आपण वेळापूर अकलूज या रस्त्याचा प्रश्न अगदी धसास लावण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहात याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे .
आपण एक हाडाचे पत्रकार आहात आणि पत्रकारिता आपण स्वतः जगत आहात. आज या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या संरक्षणासाठी निश्चितच आपले नाव अग्रक्रमाने घेतले जाईल.
वेळापूर अकलूज हा रस्ता एक अवघड जागचं दुखणं होऊन बसलेला आहे . मी या खंडाळीचा रहिवासी असल्यामुळे दररोज या रस्त्यावरून जाणारी ची काय परिस्थिती होते हे आम्ही जवळून पाहत आहे
.एका बाजूने गेलेला संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग आणि दुसऱ्या बाजूने गेलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग या मार्गाचा दुवा म्हणून खऱ्या अर्थाने वेळापूर अकलूज या रस्त्याचे नाव घ्यावे लागेल आणि याच रस्त्यावर लोकांची हेळसांडच होत नाही तर बऱ्याच जणांना आपले जीव सुद्धा गमवावे लागलेले आहेत किंवा काहीजणांना कायमचे अपंगत्व झालेले आहेत
.प्रत्येक वर्षी हा रस्ता खराब होतो ठेकेदार खड्डे मुजवतो आणि पुन्हा एकदा दोन-तीन महिन्यातच या रस्त्यावर खड्डे पडले जातात आणि अपघात होऊन अनेकांची आयुष्य नव्हे तर कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त होतात याची फिकीर ना सरकारला ना प्रशासनाला परंतु आपण आपल्या खमक्या पत्रकारितेच्या जोरावर प्रशासनाला धारेवर धरून हा रस्ता करावयास भाग पाडले आहे
आपण ज्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे त्याचं आम्हास कौतुक आहे निश्चितपणे आपण उत्तम पत्रकार तर आहेच परंतु संवेदना जाणणारा एक माणूस सुद्धा तुमच्यात लपलेला आहे हे आम्ही निश्चित सांगू शकतो
आपण समाज उपयोगी प्रत्येक गोष्टीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवाल हीच अपेक्षा धन्यवादआमच्याकडून आपणास जनरेट्याची गरज लागल्यास आम्ही कधीही तयार आहोत.

*विनोद थिटे दत्तनगर खंडाळी.*
4:-➡️*लोकशाहीचा चौथा स्तंभ… आणि एक जिद्दी पत्रकाराची लढाई*
लोकशाहीत पत्रकारितेला “चौथा स्तंभ” मानले जाते. कारण सत्तेला प्रश्न विचारणे, जनतेचा आवाज बनणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे ही पत्रकारांची जबाबदारी असते.
आज गणेश जाधव हे नाव अकलूज–वेळापूर रस्त्याच्या प्रश्नावर अशाच जिद्दीने उभे आहे.अनेक दिवसांपासून ते या रस्त्याच्या दुरवस्थेविरुद्ध सातत्याने लेखन करत आहेत. खड्ड्यांनी विदीर्ण झालेला मार्ग, वाढते अपघात, धूळ आणि जीवघेणा प्रवास — या सर्व बाबींवर त्यांनी निर्भीडपणे प्रकाश टाकला.
त्यांचा हेतू कुणावर टीका करणे नाही; तर एकच तळमळ आहे —“कोणाच्याही घरात दुःखाचे वातावरण निर्माण होऊ नये.”
त्या रस्त्यावरून ये-जा करताना एखाद्या कुटुंबाचा आधार अपघातात जाऊ नये, एखाद्या आईचा मुलगा, एखाद्या पत्नीचा नवरा किंवा एखाद्या मुलांचा वडील कायमचा हिरावला जाऊ नये — एवढीच त्यांची भूमिका आहे.मात्र प्रश्न असा आहे की, एवढ्या सातत्याने, एवढ्या तळमळीने आवाज उठवूनही त्यांची दखल का घेतली जात नाही?
एक साधा रस्ता — काही किलोमीटर अंतराचा.तो पूर्णपणे दुरुस्त करणे इतके अवघड आहे का?खड्डे बुजवणे, मजबुतीकरण करणे, कायमस्वरूपी उपाययोजना करणे — ही प्रशासनासाठी अशक्य गोष्ट आहे का?सर्वसामान्य नागरिकांचा आवाज अनेकदा दुर्लक्षित होतो, ही वस्तुस्थिती आहे.
पण जेव्हा एक पत्रकार स्वतःचा वेळ, परिश्रम आणि जबाबदारी घेऊन हा मुद्दा सातत्याने मांडतो, तरीही प्रशासन शांत का?
अकलूज ते वेळापूर हा रस्ता केवळ डांबराचा तुकडा नाही — तो हजारो नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याचा आधार आहे. आणि त्या आधारासाठी जर एक पत्रकार संघर्ष करत असेल, तर समाजाने त्यांना साथ देणे ही देखील सामूहिक जबाबदारी आहे
.आज गरज आहे ती एकजुटीची.गरज आहे सरकारला जागे करण्याची.गरज आहे प्रशासनाला सांगण्याची —हा प्रश्न व्यक्तीचा नाही, तर जनतेच्या सुरक्षिततेचा आहे.जाधव साहेबांचा संघर्ष केवळ बातमीपुरता मर्यादित नाही; तो भविष्यातील अपघात टाळण्याचा प्रयत्न आहे.आता प्रश्न आहे —
आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार का?कारण उद्या एखादा अपघात झाला, तर प्रश्न फक्त प्रशासनाला नव्हे, तर आपल्या शांततेलाही विचारला जाईल

*श्री अजित भागवत पताळे* *ओनर :- नागनाथ ॲग्रोटेक अकलूज.*
नागरिकांच्या या प्रतिक्रिया दर्शवितात की, पत्रकारितेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जनतेमध्ये जागृती निर्माण होत आहे.
मात्र तात्पुरत्या डागडुजीवर समाधान न मानता अकलूज–वेळापूर रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण व्हावे, अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.
*क्रमशः भाग -18.*
#अकलूज_वेळापूर_रस्ता#संघर्षयोद्धा#गणेशजाधव#रस्तादुरुस्ती#खड्डेमुक्त_रस्ता#नागरिकांचा_आवाज#लोकशाहीचा_चौथा_स्तंभ#पत्रकारितेचा_संघर्ष#जनतेची_मागणी#कायमस्वरूपी_मजबुतीकरण#प्रवाशांची_सुरक्षा#अपघातमुक्त_रस्ता#अकलूज#वेळापूर#सामाजिक_बांधिलकी
🚨 अकलूज – वेळापूर रस्ता : संघर्ष सुरूच 🚨
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील गंभीर समस्यांविरोधात १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहे. 👥 नागरिकांची व्यथा स्पष्ट आहे —“दररोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष!”खड्डे, अपूर्ण कामे, उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि वाढता अपघातांचा धोका यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. रुग्णवाहिकांनाही वेगाने धावणे कठीण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 🙏 अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले —“कुणीतरी आमचा आवाज उठवतोय!” 🔥 आम्ही थांबणार नाही!रस्ता पूर्ण आणि सुरक्षित होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम होईपर्यंत सातत्याने प्रश्न विचारले जातील. ➡️ या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी आपले अनुभव, तक्रारी व सूचना आम्हाला पाठवा.हा लढा आपल्या सर्वांचा आहे. 📲 ७८४१८४७४५८. ✊ *एकत्र येऊया, आवाज बुलंद करूया!**खड्डेमुक्त रस्ता हा आमचा हक्क आहे!*







पत्रकारिता हे सामाजिक बांधिलकीचा चौथा आधारस्तंभ आहे ते ठीकच आहे पण आज जवळ जवळ महिना झाला यावरती आपण निवडून दिलेले लोकप्रथनिधी झोपलेत की काय काय दुरदैव आहे या दोन्ही गावांचे बघा एका बाजूला अकलूज त्यामध्ये एक आमदार +एक खासदार आणि दुसरीकडे वेळापूर वर्तमान आमदार आणि दोघांना जोडणारा मुख्य मार्ग याची अशी अवस्था कल्पनेच्या परे आहे जर खरेच या लोकप्रतिनिधीनां जर थोडीशी बाकी असेल तर ज्या समाजाने त्यांना इथपर्यंत पोहोचवले त्यांच्या साठी एवढा मार्ग व्यवस्थित करावा अशी आम्ही अपेक्षा करतोय
खरंच आपण ही मोहीम चालवीत आहात त्याबद्दल आपलें मनापासून आभार.