माळशिरस पंचायत समिती लाच प्रकरणात नवा ट्विस्ट.बिडीओ पांढरे यांचे नाव फिर्यादीत
माळशिरस (प्रतिनिधी )माळशिरस येथील पंचायत समितीतील लाच प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.
माळशिरस पंचायत समिती चे गटविकास अधिकारी (BDO) पांढरे यांच्या नावाचा उल्लेख थेट फिर्यादीत करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी सुंदरराव उत्तम नागटिळक यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, स्वतःसाठी पाच हजार रुपये आणि गटविकास अधिकारी पांढरे यांच्यासाठी पाच हजार रुपये अशी एकूण दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली.
या तक्रारीनंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून, आता अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे सोलापूर जिल्हा भर चर्चा रंगली आहे. पंचायत समितीवर सध्या प्रशासक कार्यरत असल्याने प्रशासनातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सभापती व उपसभापती पदांची निवड अद्याप झालेली नसल्याने राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.
आता पोलिस तपास आणि संबंधित विभागीय चौकशी अहवालानंतरच गटविकास अधिकारी पांढरे यांच्याविरोधात कोणती कारवाई होणार हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या नव्या घडामोडींमुळे पंचायत समितीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






