माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील यमाई देवी मंदिर परिसराची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची पाहणी
अकलूज (प्रतिनिधी )
माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील यमाई देवी मंदिर, महाळुंग परिसराची पाहणी धैर्यशील मोहिते पाटील, खासदार माढा लोकसभा मतदारसंघ यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.
ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या या मंदिराच्या जतन व संवर्धन कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला
.पाहणीदरम्यान मंदिर परिसरातील प्राचीन वास्तूंची सध्यस्थिती, तसेच सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली
. मंदिराचे ऐतिहासिक वैभव अबाधित राखत विकासकामे करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना खासदार मोहिते पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह मूलभूत सुविधांच्या उभारणीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या पाहणीमुळे मंदिराच्या संवर्धन कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






