*डम्पिंग ग्राउंडवरील कर्मचाऱ्यांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर — भाजप नगरसेवक महेश शिंदे आक्रमक*
अकलूज : अकलूज नगर परिषद हद्दीतील डम्पिंग ग्राउंड येथे काम करताना तसेच आग विझविताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा साहित्य उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आल्याने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून निर्माण होणारा विषारी धूर व घातक वायू कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धोकादायक परिस्थितीत काम करताना सेफ्टी बूट, हातमोजे, मास्क व संरक्षण साहित्य देणे हे घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 तसेच Occupational Safety, Health and Working Conditions Code 2020 नुसार बंधनकारक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.कर्मचाऱ्यांच्या जीविताशी संबंधित बाब असल्याने डम्पिंग ग्राउंड येथे काम करणाऱ्या व आग विझविण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्यावे,
अन्यथा पुढील स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






