सर्वांसाठी घरे धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी – भाजप अकलूज शहराची मागणी
अकलूज शहरातील शासकीय जागांवर अनेक वर्षांपासून निवासी स्वरूपात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अकलूज शहराच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी सचिन पाटील यांना सादर करण्यात आले.
“सर्वांसाठी घरे” या शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत विविध शासकीय विभागांच्या जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे आवश्यक आहे.
अकलूज शहरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेत वास्तव्यास आहेत. मात्र मालकी हक्क अथवा अधिकृत नोंद नसल्यामुळे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना चा लाभ घेता येत नाही.
महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2019/प्र.क्र.15/नवि-26, दिनांक 06 मार्च 2019 नुसार शासकीय जागेत वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची तरतूद आहे.
त्यानुसार अकलूज शहरातील पात्र लाभार्थ्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.हे निवेदन भाजप अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
यावेळी अमोल माने (सरचिटणीस, अकलूज शहर), विक्रांत देशमाने (नगरसेवक), राहुल लोंढे (नगरसेवक), महेश शिंदे, शशिकांत रनवरे, संतोष वाघमोडे, शिवम वाघमारे, तेजस उबाळे, सौ. दिपाली ताई वाघमोडे (नगरसेविका), सौ. जयश्री ताई एकतपुरे (नगरसेविका) आदी उपस्थित होते
.प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने पुढील आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.






